हिंगोली येथे नरसी नामदेव देवस्थानातील गैरसोयींविरोधात 13 मे रोजी तीव्र आंदोलनाचा इशारा

श्रीक्षेत्र नर्सी नामदेव येथील भाविकांच्या गैरसोयी दूर न केल्यास १३ मे २०२६ रोजी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेने दिला आहे.<br/>

हिंगोली येथे  नरसी नामदेव देवस्थानातील गैरसोयींविरोधात 13 मे रोजी तीव्र आंदोलनाचा इशारा

Narsi Namdev News

हिंगोली (Narsi Namdev News) : श्रीक्षेत्र नर्सी नामदेव येथे भाविकांना होणाऱ्या गैरसोयी तात्काळ दूर कराव्यात, अन्यथा 13 मे 2026 रोजी एकादशीच्या दिवशी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेने देवस्थान ट्रस्ट आणि संबंधित प्रशासनाला दिला आहे.

संत शिरोमणी नामदेव महाराजांचे जन्मस्थान असलेल्या या पवित्र क्षेत्रात महाराष्ट्रासह पंजाबसारख्या इतर राज्यांतून दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भाविकांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. तीव्र उन्हामध्ये दर्शन रांगेत उभ्या भाविकांसाठी कोणत्याही प्रकारचे मंडप किंवा शेड उपलब्ध नाहीत. पिण्याच्या स्वच्छ पाण्याची पुरेशी व्यवस्था नसून पार्किंग आणि दर्शन व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. यामुळे वृद्ध, महिला आणि सर्वसामान्य भाविकांची मोठी हेळसांड होत आहे. ही बाब संत नामदेव महाराजांच्या पवित्र भूमीला शोभणारी नसल्याचे संघटनेने म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर संघटनेचे श्री. गजानन प्रकाश कावरखे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शुक्रवारी, 2 मे रोजी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व सचिव तसेच नर्सी नामदेव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घारगे यांना निवेदन सादर केले. या निवेदनावर श्री. गजानन प्रकाश कावरखे, मारोती श्रीराम लांबुटे, राहुल पूरभू जाधव, दशरथ गजानन मुरके, मनोहर भगवान पाटील, मनोज शावल चव्हाण, गणेश रामभाऊ भोईटे व इतर पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.

निवेदनाद्वारे दर्शन रांगेत तात्काळ मंडप उभारणे, पिण्याच्या पाण्याची स्वच्छ व्यवस्था करणे आणि शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानाप्रमाणे शिस्तबद्ध व सुलभ दर्शन व्यवस्था राबवण्याची मागणी करण्यात आली आहे. जर लवकरात लवकर योग्य उपाययोजना झाल्या नाहीत, तर 13 मे 2026 रोजी नामदेव महाराजांची पालखी घेऊन रस्त्यावर बसून व डोळ्यावर पट्टी बांधून लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

पालकमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पालकमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दौऱ्यापूर्वी नामदेव पतंगे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा आरोप; जिल्हाभर आंदोलनाचा इशारा.

Sep 16, 2026
रिसोडच्या कालुषा बाबा दर्गा जागेवरील अनधिकृत बांधकामाविरोधात बेमुदत उपोषण सुरू

रिसोडच्या कालुषा बाबा दर्गा जागेवरील अनधिकृत बांधकामाविरोधात बेमुदत उपोषण सुरू

Risod Hunger strike: शहरातील नावाजलेल्या सिव्हिल लाईन भागात असलेल्या 'कालुषा बाबा दर्गा'च्या जागेवर होत असलेले बेकायदेशीर आणि अनधिकृत बांधकाम तातडीने थांबवण्यात यावे

Jul 27, 2026
चिखली शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही!

चिखली शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही!

चिखली शहरासह जिल्ह्यातील विविध स्वीटमार्ट्समध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाची मिठाई विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Jul 18, 2026
डीएपी, पीक विमा आणि बोगस निविष्ठांच्या प्रश्नावर क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक

डीएपी, पीक विमा आणि बोगस निविष्ठांच्या प्रश्नावर क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक

खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने हिंगोली येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची भेट घेतली.

Jun 23, 2026
शेतकऱ्यांनो एकत्र या;तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा – विनायक सरनाईक

शेतकऱ्यांनो एकत्र या;तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा – विनायक सरनाईक

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीकविमा तसेच अन्य प्रलंबित मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी उद्यापासून आरपारची लढाई छेडण्याचा एल्गार पुकारला आहे.

Jun 15, 2026