बीडगाव/ नागपूर (Bidgaon Nagar Panchayat) : भारतीय जनता पक्षाच्या बीडगाव नगरपंचायतीची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासोबतच आगामी काळात नागरिकांच्या विविध प्रश्नांसाठी प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली (Bidgaon Nagar Panchayat) नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये भाजप अध्यक्षपदी पुंडलिकजी कुर्वेकर, भाजप महिला अध्यक्षपदी सपना दांडवे आणि भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी रजत पराते यांची निवड करण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे, पक्षाचा जनाधार वाढविणे तसेच बूथ पातळीवरील संघटन अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, नव्या कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचे भाजप कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. आगामी काळात बीडगाव नगरपंचायत परिसरात पक्षाची संघटनात्मक ताकद आणखी वाढविण्यासाठी नवी कार्यकारिणी प्रभावीपणे काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी नियुक्तीसाठी पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, माजी आमदार टेकचंदजी सावरकर, जिल्हाध्यक्ष आनंदरावजी राऊत, जिल्हा महामंत्री अनिलजी निदान, जिल्हा मंत्री रमेशजी चिकटे, तालुकाध्यक्ष सचिनजी घोरमाडे, बीडगाव नगरपंचायत अध्यक्ष वीरूजी जामगडे, महिला मोर्चा अध्यक्ष नेहाताई राऊत, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष राहुल बोढारे तसेच बीडगाव भाजपचे सर्व ज्येष्ठ नेते व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.