Nitin Gadkari

नितीन गडकरींना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; AI-निर्मित कथित डीपफेक आणि बदनामीकारक मजकूर हटवण्याचे आदेश

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

नितीन गडकरींना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; AI-निर्मित कथित डीपफेक आणि बदनामीकारक मजकूर हटवण्याचे आदेश

Nitin Gadkari

इथेनॉलमिश्रित इंधन व E-20 वादाशी जोडलेल्या कथित दिशाभूल करणाऱ्या डिजिटल सामग्रीवर न्यायालयाची कारवाई; मेटा, गुगल आणि एक्सला निर्देश

मुंबई : इथेनॉलमिश्रित इंधन आणि E-20 उपक्रमाबाबत सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या कथित AI-निर्मित डीपफेक व्हिडिओ आणि डिजिटल सामग्रीप्रकरणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात न्यायालयाने संबंधित आक्षेपार्ह मजकूर आणि व्हिडिओ हटविण्याचे निर्देश विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना दिले आहेत.

गेल्या काही दिवसांत इथेनॉल धोरणासंदर्भात नितीन गडकरी यांच्याविषयी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ आणि विविध प्रकारचा डिजिटल मजकूर प्रसारित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी मेटा, गुगल LLC, एक्स आणि इतर संबंधित संस्थांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने यापूर्वी ही याचिका स्वीकारल्यानंतर बुधवारी या प्रकरणावर सुनावणी झाली.

न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठाने सुनावणीदरम्यान इथेनॉलमिश्रित इंधनासंदर्भातील वादाशी जोडलेले कथित AI-निर्मित डीपफेक व्हिडिओ तसेच छेडछाड करण्यात आलेली डिजिटल सामग्री हटविण्याचे आदेश दिले.

याचिकेमध्ये गडकरी यांनी स्पष्ट केले होते की, इथेनॉलमिश्रित पेट्रोल आणि E-20 उपक्रमाचा संबंध केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाशी असून, या उपक्रमांशी त्यांचा कोणताही वैयक्तिक संबंध नाही. तरीही सोशल मीडियावर त्यांचे नाव या योजनांशी जोडून कथित बदनामीकारक सामग्री प्रसारित करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता.

याचिकेनुसार संबंधित व्हिडिओ आणि पोस्ट प्रथमदर्शनी खोट्या, बनावट, द्वेषपूर्ण, आक्षेपार्ह आणि बदनामीकारक स्वरूपाच्या आहेत. तसेच गडकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी इथेनॉल योजनांमधून आर्थिक लाभ घेतल्याचे करण्यात आलेले आरोप दिशाभूल करणारे आणि वस्तुस्थितीविरुद्ध असल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले होते.

याचिकेचा उद्देश सार्वजनिक धोरणांवर होणारी चर्चा, विश्लेषण, वादविवाद किंवा रास्त टीका रोखणे नसून, केवळ खोटी आणि दिशाभूल करणारी डिजिटल सामग्री हटविणे हा असल्याचेही गडकरी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते.

गडकरी यांचा हा युक्तिवाद ग्राह्य धरत उच्च न्यायालयाने इथेनॉलमिश्रित इंधन (E-20) वादाशी संबंधित कथित AI-निर्मित आणि बदनामीकारक सामग्री हटविण्याचे आदेश दिले. यावेळी अशा प्रकारचा आक्षेपार्ह डिजिटल मजकूर त्वरित हटविण्यासाठी प्रभावी यंत्रणा उपलब्ध नसल्याबद्दल न्यायालयाने चिंता व्यक्त केली. परिणामी नागरिकांना न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागत असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.

संबंधित सामग्री

तुर्कीतील स्टील प्लांटमध्ये भीषण स्फोट! १६ कामगारांचा मृत्यू, १३ जखमी; एर्दोआन यांच्याकडून चौकशीचे आदेश

तुर्कीतील स्टील प्लांटमध्ये भीषण स्फोट! १६ कामगारांचा मृत्यू, १३ जखमी; एर्दोआन यांच्याकडून चौकशीचे आदेश

तुर्कीतील इजमिरच्या स्टील प्लांटमध्ये भीषण स्फोट! १६ कामगारांचा मृत्यू, १३ जखमी. एर्दोआन यांचे चौकशीचे आदेश; पाच संशयित पोलिसांच्या ताब्यात.

Nov 10, 2026
मुंबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात टीएमसी आमदाराला अटक; कोलकाता विमानतळावर पोलिसांची कारवाई

मुंबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात टीएमसी आमदाराला अटक; कोलकाता विमानतळावर पोलिसांची कारवाई

बलात्कार आणि खंडणीच्या आरोपांप्रकरणी फरार असलेले टीएमसी आमदार परेश राम दास यांना मुंबईला जाण्यापूर्वी कोलकाता विमानतळावर अटक.

Nov 10, 2026
गोकुळच्या ४ तज्ज्ञ संचालकांची नावे सतेज पाटलांनी फोडली; सांगलीतील व्यक्तीचाही समावेश!

गोकुळच्या ४ तज्ज्ञ संचालकांची नावे सतेज पाटलांनी फोडली; सांगलीतील व्यक्तीचाही समावेश!

गोकुळच्या चार तज्ज्ञ संचालकांची नावे सतेज पाटलांनी जाहीर केली. सांगलीतील व्यक्तीच्या नियुक्तीवरून महायुती सरकारवर जोरदार टीका.

Nov 09, 2026
 पबमध्ये शर्ट काढून फिरवला अन् वाद पेटला! तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला, महिलेसह चौघांना अटक

पबमध्ये शर्ट काढून फिरवला अन् वाद पेटला! तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घातला, महिलेसह चौघांना अटक

पुण्यातील विमाननगरमध्ये पबमधील वादातून तरुणावर सिमेंटच्या गट्टूने हल्ला. या प्रकरणी एका महिलेसह चौघांना अटक.<br/>

Nov 09, 2026
गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणकंदन! सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा विराट संघर्ष मोर्चा

गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणकंदन! सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा विराट संघर्ष मोर्चा

गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा. महायुतीच्या पाच तज्ज्ञ संचालक नियुक्तींविरोधात शेतकरी आक्रमक.

Nov 09, 2026