मोकाट कुत्र्या हल्ला

परभणीत तीन वर्षाच्या मुलावर मोकाट कुत्र्यांचा हल्ला

Stray dog ​​attack: जिंतूर  तालुक्यातील येथे मोकाट कुत्र्यांच्या झुंडाने तीन वर्षीय मुलावर हल्ला केला. यामध्ये सदर मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल

परभणीत तीन वर्षाच्या मुलावर मोकाट कुत्र्यांचा हल्ला

Stray dog ​​attack

 

मानधानी येथील घटना; गंभीर जखमी बालकावर परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार

परभणी (Stray dog ​​attack) : जिंतूर  तालुक्यातील येथे मोकाट कुत्र्यांच्या झुंडाने तीन वर्षीय मुलावर हल्ला केला. यामध्ये सदर मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना सोमवार १० ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास जिंतूर तालुक्यातील मानधानी येथे घडली. 

या (Stray dog ​​attack) घटनेबाबत अधिक माहिती अशी की, महादेव विलास जावडे हा  मुलगा आपल्या घरासमोर खेळत होता. यावेळी गावातील ३ ते ४ मोकाट कुत्र्यांनी अचानक त्याच्यावर हल्ला चढविला. चावा घेतल्याने मुलगा जखमी झाला. त्याच्या ओरड्याचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बाळू मुळे, संतोष पाडळकर, बंडू हरकळ, सुभाष मस्के यांनी कुत्र्यांना हुसकावून लावले. गंभीर महादेवला उपचारासाठी परभणीतील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. बालकाचे वडिल मेंढपाळ असून घटनेच्या वेळी ते मेंढ्या चारण्यासाठी गेले होते. तर आई घरकामात व्यस्त होती. यावेळी मोकाट कुत्र्यांनी सदर मुलावर हल्ला चढविला. कुत्र्यांचा बंदोबस्त करावा यासाठी ग्रामपंचायत व प्रशासनाने ठोस उपाय योजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

संबंधित सामग्री

परभणीत झरी येथे दोन चोरट्यांना शेतकर्‍यांनी पकडले; विद्युत मोटार केबल, शेतमशागतीचे साहित्य चोरी

परभणीत झरी येथे दोन चोरट्यांना शेतकर्‍यांनी पकडले; विद्युत मोटार केबल, शेतमशागतीचे साहित्य चोरी

Parbhani Farm Produce Theft: तालुक्यातील झरी  येथे केबल, मोटार, शेतीसाहित्य चोरी करतांना दोन चोरट्यांना शेतकर्‍यांनी पकडले. इतर चोरटे अ‍ॅटोतून पसार होण्यात यशस्वी झाले.

Aug 20, 2026
परभणीत स्कॉर्पिओ वाहनातून गावठी पिस्तूल, काडतूस जप्त

परभणीत स्कॉर्पिओ वाहनातून गावठी पिस्तूल, काडतूस जप्त

Parbhani Pistol Seized: पोलिस अंमलदारांचे सावलांती व्हॅकेशन होत असलेल्या गृहासमोर एक स्कॉर्पिओ मशीनवर अवैध पिस्तूळ आणि काडतूस जेवून आहेत. नए मोंढा गुन्हा दाखला करण्यात आला.

Aug 06, 2026
परभणीत लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन अत्याचार...!

परभणीत लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन अत्याचार...!

Minor Girl Sexual Assault: अल्पवयीन मुलाला लग्नामिष दाखवून आणि विनयभंग करण्यात आले. परभणी व झिंतूर येथील घटनेत पोलिसात गुन्हा दाखल करून तपास सुरू.

Jul 05, 2026
परभणीच्या वांगी येथे शॉर्टसर्किट होऊन आखाड्यास लागली आग

परभणीच्या वांगी येथे शॉर्टसर्किट होऊन आखाड्यास लागली आग

Parbhani short circuit fire: परभणी तालुक्यातील वांगी येथील एका शिवारातील आखाड्यात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. विद्युत तारांमुळे जळलेल्या ठिंगांमुळे आखाड्याला आग लागली.

May 31, 2026