परभणी पिस्तूल-काडतूस जप्त

परभणीत स्कॉर्पिओ वाहनातून गावठी पिस्तूल, काडतूस जप्त

Parbhani Pistol Seized: पोलिस अंमलदारांचे सावलांती व्हॅकेशन होत असलेल्या गृहासमोर एक स्कॉर्पिओ मशीनवर अवैध पिस्तूळ आणि काडतूस जेवून आहेत. नए मोंढा गुन्हा दाखला करण्यात आला.

परभणीत स्कॉर्पिओ वाहनातून गावठी पिस्तूल, काडतूस जप्त

Parbhani Pistol Seized

 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची सावली विश्रामगृहासमोर कारवाई

परभणी (Parbhani Pistol Seized) : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वसमत रोडवर सावली विश्रामगृहा समोर केलेल्या कारवाईत एका स्कॉर्पिओ वाहनातून लोखंडी गावठी पिस्तूल, तीन जीवंत काडतूस जप्त केले. ही कारवाई ५ ऑगस्टच्या रात्री दहा वाजता करण्यात आली. सदर प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

स्थागुशाचे पोनि. गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. चंदनसिंह परिहार, गणेश सवंडकर, मधुकर चट्टे, सपोउपनि. भुजबळ, केंद्रे, पोलीस अंमलदार आगळे, पांगरकर, परसोडे, पुरी, धोत्रे, इमरान सपकाळ यांचे पथक अवैध धंद्यांची माहिती काढत गस्त घालत होते. या पथकाला सावली विश्राम गृहासमोर एक इमस स्कॉर्पिओ वाहनात गावठी पिस्तूल, जीवंत काडतून घेवून असल्याचे समजले.

पोलिसांनी वाहनासह इसमाला ताब्यात घेतले. त्याच्या गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये पिस्तूल आणि जीवंत काडतूस मिळून आले. अधिक चौकशी केल्यावर संबंधिताने सदरचे पिस्तूल रवि भंवर रा. वणी जि. नाशिक याने दिल्याचे सांगितले. पोलिसांनी या (Parbhani Pistol Seized) कारवाईत वाहनासह १० लाख ३१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अंमलदार नेताजी गिते यांच्या फिर्यादीवरुन नागेश गंगाधर हरबळे, रवि भवर या दोघांवर नवा मोंढा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

परभणीत झरी येथे दोन चोरट्यांना शेतकर्‍यांनी पकडले; विद्युत मोटार केबल, शेतमशागतीचे साहित्य चोरी

परभणीत झरी येथे दोन चोरट्यांना शेतकर्‍यांनी पकडले; विद्युत मोटार केबल, शेतमशागतीचे साहित्य चोरी

Parbhani Farm Produce Theft: तालुक्यातील झरी  येथे केबल, मोटार, शेतीसाहित्य चोरी करतांना दोन चोरट्यांना शेतकर्‍यांनी पकडले. इतर चोरटे अ‍ॅटोतून पसार होण्यात यशस्वी झाले.

Aug 20, 2026
परभणीत तीन वर्षाच्या मुलावर मोकाट कुत्र्यांचा हल्ला

परभणीत तीन वर्षाच्या मुलावर मोकाट कुत्र्यांचा हल्ला

Stray dog ​​attack: जिंतूर  तालुक्यातील येथे मोकाट कुत्र्यांच्या झुंडाने तीन वर्षीय मुलावर हल्ला केला. यामध्ये सदर मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी परभणी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल

Aug 11, 2026
परभणीत लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन अत्याचार...!

परभणीत लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन अत्याचार...!

Minor Girl Sexual Assault: अल्पवयीन मुलाला लग्नामिष दाखवून आणि विनयभंग करण्यात आले. परभणी व झिंतूर येथील घटनेत पोलिसात गुन्हा दाखल करून तपास सुरू.

Jul 05, 2026
परभणीच्या वांगी येथे शॉर्टसर्किट होऊन आखाड्यास लागली आग

परभणीच्या वांगी येथे शॉर्टसर्किट होऊन आखाड्यास लागली आग

Parbhani short circuit fire: परभणी तालुक्यातील वांगी येथील एका शिवारातील आखाड्यात शॉर्टसर्किटमुळे आग लागली. विद्युत तारांमुळे जळलेल्या ठिंगांमुळे आखाड्याला आग लागली.

May 31, 2026
परभणीत अंघोळीसाठी गोदापात्रात उतरलेल्या तरुणाचा मृत्यू

परभणीत अंघोळीसाठी गोदापात्रात उतरलेल्या तरुणाचा मृत्यू

Deserving youth Death: परभणीत दोन घटना: एका तरुणाने गोदावरी नदीपात्रात उतरलेल्या व दुसऱ्याने किडनीच्या आजारामुळे मृत्यू झाला. पालम तालुक्यातील अंघोळीसाठी उतरलेला तरुण पाण्यात बुडला

May 26, 2026