परभणी डिजीटल अरेस्ट

परभणीत डिजीटल अरेस्ट; सेवानिवृत्त प्राध्यापक दाम्पत्याला गंडविले...!

Parbhani Digital Arrest:

परभणीत डिजीटल अरेस्ट; सेवानिवृत्त प्राध्यापक दाम्पत्याला गंडविले...!

Parbhani Digital Arrest

 

१ कोटी ११ हजार रुपयांची फसवणूक शहरातील नवा मोंढा पोलिसात गुन्हा दाखल

परभणी (Parbhani Digital Arrest) : तुमच्या आधार कार्डच्या आधारे दहशतवाद्याने बँकेत खाते काढले असून या खात्याद्वारे आर्थिक व्यवहार झाल्याची केस नोंद असल्याचे सांगत सेवानिवृत्त प्राध्यापक बडोले दाम्पत्याला डिजीटल अरेस्ट करत वेगवेगळ्या चार खात्यातून मिळून १ कोटी ११ हजार रुपये घेत आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना परभणी शहरातील समाधान नगर भागात घडली. या प्रकरणी ६ ऑगस्ट रोजी नवा मोंढा पोलीस ठाण्यात पाच ते सहा अनोळखी इसमांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

फिर्यादी प्राध्यापक हे कृषी महाविद्यालयातून सेवानिवृत्त आहेत. त्यांचे वय ७९ वर्ष असून त्यांच्या ७५ वर्षीय पत्नीही प्राध्यापक या पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या आहेत. १६ जुलै रोजी सकाळी नऊच्या सुमारास त्यांना व्हॉट्स व्हिडिओ कॉल आला. समोरील व्यक्तीने दिल्ली पोलीस हेडकॉर्टर येथून बोलत आहे, असे सांगून तुमचे आधार कार्ड आतंकवाद्याकडे मिळाले आहे, त्यामुळे तुमच्या विरुध्द गुन्हा नोंद झाला आहे, असे बोलून वरिष्ठांशी बोला म्हणत फोन दुसर्‍या व्यक्तीकडे दिला. त्या व्यक्तीने तुम्हाला हाऊस अरेस्ट करण्यात येत आहे, असे सांगितले. प्राध्यापक दांम्पत्याला डिजीटल अरेस्ट करण्यात आले. दुसर्‍या दिवशी पुन्हा त्यांना फोन आला. समोरील व्यक्तीने त्यांना धमकी दिली.

आधार कार्डचा वापर करुन दहशतवाद्यांनी बँक खाते उघडले असून त्याचा आर्थिक व्यवहारासाठी वापर झाल्याची केस दाखल झाली आहे, चौकशी करायची असे सांगून तुमच्या जवळ असलेले सर्व पैसे एकाच खात्यावर जमा करा, असे सांगितले. (Parbhani Digital Arrest) सर्व रक्कम एका खात्यावर जमा केल्यानंतर आरटीजीएस व इतर मार्गाने रक्कम दुसर्‍या खात्यावंर ट्रान्सफर करण्यात आली. समोरील व्यक्तींनी तीस दिवसात तुमची रक्कम परत जमा होईल असे सांगितले होते. मात्र रक्कम आली नाही. फिर्यादी दाम्पत्याने फोन केला असता फोनही लागला नाही. फसवणुकीचा हा प्रकार १६ जुलैच्या सकाळी नऊ ते २९ जुलैच्या सकाळी अकरा या दरम्यान घडला. एकूण १ कोटी ११ हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी पाच ते सहा अनोळखी इसमांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित सामग्री

‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यापासून सावध राहा; बुलढाणा पोलीस दलाचे नागरिकांना आवाहन

‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यापासून सावध राहा; बुलढाणा पोलीस दलाचे नागरिकांना आवाहन

Digital Arrest Trap: वाढत्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही भीतीपोटी गुन्हेगारांच्या जाळ्यात न अडकण्याचे आवाहन

Sep 03, 2026
परभणीत शासनाची आर्थिक फसवणुक; कनिष्ठ लिपीकासह दोन अधिकार्‍यांवर गुन्हा...!

परभणीत शासनाची आर्थिक फसवणुक; कनिष्ठ लिपीकासह दोन अधिकार्‍यांवर गुन्हा...!

Parbhani Financial Fraud: लेखा व कोषागार कार्यालयातून चार वेळा अधिकची घेतलेली एरीयसची रक्कम वेग वेगळया तारखेला कनिष्ठ लिपीकाने व्ययक्तीक खात्यावर घेऊन आर्थिक लाभ मिळवत शासनाची फसवणुक

Aug 13, 2026
परभणीत बनावट, खोट्या कागदपत्रा आधारे फसवणूक...!

परभणीत बनावट, खोट्या कागदपत्रा आधारे फसवणूक...!

Parbhani fraud case: परभणीत बनावट, खोटी माहिती वापरून फिर्यादीच्या जमीनावर कृत्रिम नोंद करून फसवणूक करण्यात आली. आरोपी प्रल्हाद नारायण मुंढे यांना जिंतूर पोलिसात दाखल

Jun 18, 2026