परभणी फसवणूक प्रकरण

परभणीत बनावट, खोट्या कागदपत्रा आधारे फसवणूक...!

Parbhani fraud case: परभणीत बनावट, खोटी माहिती वापरून फिर्यादीच्या जमीनावर कृत्रिम नोंद करून फसवणूक करण्यात आली. आरोपी प्रल्हाद नारायण मुंढे यांना जिंतूर पोलिसात दाखल

परभणीत बनावट, खोट्या कागदपत्रा आधारे फसवणूक...!

Parbhani fraud case

 

सातबारा अभिलेखात जास्तीचे क्षेत्रफळ नोंदविले; न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा

परभणी (Parbhani fraud case) : फिर्यादी यांच्या मालकीचे आणि ताब्यात असलेले क्षेत्रफळ कमी करण्यासाठी बनावट, खोटी माहिती अर्जाद्वारे देवून विश्वासघात आणि फसवणूक करण्यासाठी खोटी कागदपत्र खरी भासविली. याचा महसूल कार्यालयात वापर करुन फिर्यादीचे जमीनीचे क्षेत्र आरोपीने स्वत:च्या नावे लावून घेतले. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने आरोपी विरोधात १७ जून रोजी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दत्ता किशन मुंढे यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादीची तालुक्यातील शेवडी येथे काही जमीन आहे. आरोपी हा फिर्यादीच्या भावकितील असून त्याने सदर जमीनी बाबत खोटे बनावट कागदपत्र सादर करत सातबारावर नोंद घेतली. आरोपीने स्वत:चा फायदा आणि फिर्यादीचे नुकसान व्हावे, या हेतूने सदर कृत्य केले. आरोपीने दिलेल्या अर्जानुसार त्याच्या नावाने अतिरिक्त क्षेत्रफळाची नोंद सातबारावर लावली. यानंतर फिर्यादी जिंतूर पोलिसात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही. (Parbhani fraud case) फिर्यादीने न्यायालयामध्ये दाद मागितली. न्यायालयाच्या आदेशाने आरोपी प्रल्हाद नारायण मुंढे याच्यावर जिंतूर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि. मुजमुले करत आहेत.

संबंधित सामग्री

नागपुरात 500-600 बनावट दस्तनोंदणींचा आरोप; तात्काळ विभागीय चौकशीची युवक काँग्रेसची मागणी

नागपुरात 500-600 बनावट दस्तनोंदणींचा आरोप; तात्काळ विभागीय चौकशीची युवक काँग्रेसची मागणी

नागपुरातील दुय्यम निबंधक कार्यालय क्र. 5 आणि इतर कार्यालयांमध्ये 500-600 बनावट दस्तनोंदणी झाल्याचा युवक काँग्रेसचा आरोप असून तातडीने विभागीय चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

Sep 21, 2026
१२.४० कोटींच्या कर्जप्रकरणी विकासक विजय रौंदळ यांच्यावर गुन्हा

१२.४० कोटींच्या कर्जप्रकरणी विकासक विजय रौंदळ यांच्यावर गुन्हा

पुणे महानगरपालिकेच्या बंडगार्डन पोलिसांनी वाजव्या पद्धतीने करज वसूल करण्याच्या आरोपासह, १२.४० कोटींवर करज होणाऱ्या प्रकरणात व्रतकर्तेवर 'बनावट विक्रीखत', अवाजव्या रकमेचे मागणी करणे आदी आरोप केले आहेत. यातील पोलिसांचा गुन्हा दाखला दाखल झाला आहे. प्रकरणातील तपासात कागदपत्रांचे दुरुस्ती व द्रव्यवाहतीचा अभ्यास चालू आहे.

Sep 03, 2026
ग्रामविकास राज्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही 268 शिक्षक बदली प्रकरणात फौजदारी कारवाईला टाळाटाळ

ग्रामविकास राज्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही 268 शिक्षक बदली प्रकरणात फौजदारी कारवाईला टाळाटाळ

अकोला जिल्हा परिषदेतील 268 शिक्षकांच्या बदली प्रकरणात जिल्हा परिषद प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे लेखी आदेश दिले होते.

Sep 03, 2026
वसमत नगर परिषद सर्वे नं. १८० प्रकरणात दोन आरोपी जाळ्यात

वसमत नगर परिषद सर्वे नं. १८० प्रकरणात दोन आरोपी जाळ्यात

Vasmat Municipal Council: वसमत येथील नगरपालिकेच्या मालकीची सर्वे नंबर १८० मधील भूखंड बनावट कागदाच्या आधारे स्वतःच्या नावावर करून घेतल्याचे प्रकरण आता पेटले आहे या प्रकरणात गुन्हा दाखल

Aug 07, 2026