परभणी- हिंगोली निवडणुक

शेवटच्या क्षणी विप्लव बाजोरिया यांचा पता कट; सईद खान यांना शिवसेनेची उमेदवारी

Parbhani- Hingoli Elections: परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आणि निवडणुकीत शिवसेनेने शेवटच्या क्षणी विप्लव बाजोरिया यांना बाजूला सारून पाथरी येथील सईद खान यांना उमेदवारी जाहीर

शेवटच्या क्षणी विप्लव बाजोरिया यांचा पता कट; सईद खान यांना शिवसेनेची उमेदवारी

Parbhani- Hingoli Elections

 

परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक

हिंगोली (Parbhani- Hingoli Elections) : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आणि निवडणुकीत शिवसेनेने शेवटच्या क्षणी विप्लव बाजोरिया यांना बाजूला सारून पाथरी येथील सईद खान यांना उमेदवारी जाहीर केली. शेवटच्या दिवशी सईद खान व शिवसेना उबाठाचे डॉ. विवेक नावंदर यांच्यासह एकूण सात जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

या निवडणुकीत शिवसेनेत उमेदवारीसाठी मोठी चुरस झाली. शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदे यांनी भाकरी फिरवीत पाथरी येथील सईद खान यांना उमेदवारी जाहीर केली. या उमेदवारीमुळे शिवसेनेत उत्साह असला तरी भारतीय जनता पक्षात मोठी नाराजी आहे. पक्ष दिवसेंदिवस कडव्या हिंदुत्वाच्या वाटेने जात असताना सईद खान यांची उमेदवारी भारतीय पक्षाच्या जनता मतदारांना फारशी रुचली नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी तर्फ जाहीर झाल्याप्रमाणे परभणीच्या डॉ. विवेक नावंदर यांना उमेदवारी मिळाली.

आघाडीकडे मतदारांची संख्या कमी असली तरी परभणीतून डॉ. नावंदर यांना मोठी मदत मिळेल असा विश्वास ते व्यक्त करीत आहेत. या दोन प्रमुख उमेदवारांसह माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय जामकर, विश्वजीत बुधवंत, संग्राम जामकर व मेहराज खान पठाण यांनीही उमेदवारी दाखल केली आहे. उमेदवारी परत घेण्यासाठी चार जून पर्यंत मुदत असल्याने पुढील चित्र त्यानंतरच स्पष्ट होईल असा अंदाज आहे.

लढत तिरंगी होण्याचे संकेत
संख्याबळानुसार महायुतीसाठी ही निवडणूक वरवर सोपी दिसत असली तरी तिरंगी लढत झाल्यास सईद खान यांची वाट बिकट असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जरी उमेदवारासोबत दिसत असले तरी संख्याबळ अधिक असूनही डावलल्या गेल्याचे दुःख राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदार बोलून दाखवीत आहेत. परभणीतील अनेक बड्या नेत्यांचा सईद खान यांना चांगलाच विरोध आहे. वर्चस्वाच्या या लढाईत माजी आमदार सुरेश देशमुख यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. राजकारणातील तडजोडी साठी 'मास्टर माईंड' मानल्या जाणाऱ्या सुरेश देशमुखानी नाराजांचा गठ्ठा जमविला तर ही लढत तिरंगी होण्याची शक्यता आहे.

संबंधित सामग्री

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

मराठवाडा पदवीधर मतदार यादीत ‘उद्धव मस्के’ऐवजी उद्धव ठाकरे यांचे नाव आल्याचा दावा. दिलीप घुगे यांनी प्रशासनाकडे तक्रार केली.

Oct 05, 2026
शेतकरी आत्महत्यांवर 'नगदी अनुदान' हाच प्रभावी मार्ग

शेतकरी आत्महत्यांवर 'नगदी अनुदान' हाच प्रभावी मार्ग

Shiv Sena Farmers' Conference: शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसारखी गंभीर समस्या थांबवण्यासाठी व्यावहारिक मार्ग असल्याचे प्रतिपादन शिवसेना (शिंदे गट) नेते तथा माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे

Oct 04, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत गर्जना मोर्चा; राज ठाकरेंनी SIR रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली.

Oct 04, 2026