परभणीतील पाथरी तालुक्यात वादळी पावसाचा कहर

पाथरी तालुक्यातील हादगाव व कासापुरी महसूल मंडळात शनिवारी (दि. २३ मे) सायंकाळी पाचच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मोठा तडाखा दिला.

परभणीतील पाथरी तालुक्यात वादळी पावसाचा कहर

Parbhani Storm

हादगाव, कासापुरी मंडळाला तडाखा; केळी पिकांसह सोलर पॅनलचे मोठे नुकसान

परभणी (Parbhani Storm) : पाथरी तालुक्यातील हादगाव व कासापुरी महसूल मंडळात शनिवारी (दि. २३ मे) सायंकाळी पाचच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मोठा तडाखा दिला. अवघ्या काही मिनिटांत झालेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे घरांचे, शेतपिकांचे तसेच कृषी सोलर पॅनल युनिटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शनिवारी दिवसभर ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत असतानाच सायंकाळच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि हादगाव व कासापुरी परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. याचवेळी पाथरी शहरातही जोरदार वारे वाहत होते.

प्राथमिक माहितीनुसार, हादगाव व कासापुरी महसूल मंडळ परिसरातील उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः केळी पिकाला या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका बसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. हादगाव, वरखेड, डोंगरगाव, किन्होळा व परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

वादळी वाऱ्यामुळे शेतशिवारातील सोलर पॅनल युनिटचेही मोठे नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. गाव तसेच शेत परिसरात अनेक झाडे उन्मळून पडली असून जनावरांसाठी उभारण्यात आलेल्या कडव्याच्या गंजीही वाऱ्यामुळे उडून गेल्या आहेत.

काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेल्याच्या घटनाही घडल्या असून अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

दरम्यान, झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकरी व नागरिकांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

संबंधित सामग्री

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026
पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीनंतर ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला आहे. मुंबई-कोकणात दमट उकाडा, पुण्यात बदलते हवामान आणि नागपुरात ३५ अंश तापमान आहे.

Oct 05, 2026
शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात; पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण राज्यातून माघार घेण्याची शक्यता

महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात; पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण राज्यातून माघार घेण्याची शक्यता

महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली आहे. मुंबईसह काही भागांतून माघार; पुढील २-३ दिवसांत संपूर्ण राज्यातून मान्सून परतण्याची शक्यता.

Oct 03, 2026
‘संपूर्ण रिपोर्ट आल्यानंतरच मदत’! दुष्काळी मदतीवर बावनकुळेंचं मोठं स्पष्टीकरण

‘संपूर्ण रिपोर्ट आल्यानंतरच मदत’! दुष्काळी मदतीवर बावनकुळेंचं मोठं स्पष्टीकरण

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे आणि संपूर्ण अहवालानंतर मदत देण्याची भूमिका चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली.

Sep 28, 2026