राणी इंगळे

तुळसाबाई कावल विद्यालयाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा

Rani Ingale: पातूरच्या तुळसाबाई कावल विद्यालयातील राणी अलका ज्ञानेश्वर इंगळे हिने बारावी आणि बी.टेक पूर्ण केल्यानंतर एमबीएसाठी निवड मिळवून विद्यालयाच्या शिरपेच्यात एक नवा मानाचा तुरा

तुळसाबाई कावल विद्यालयाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा

Rani Ingale

राणी इंगळे हिची भारतीय प्रबंध संस्थान, इंदोर येथे निवड

पातूर (Rani Ingale) : तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पातूर येथील द्विलक्षी अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी राणी अलका ज्ञानेश्वर इंगळे (Rani Ingale) हिची भारतीय प्रबंध संस्थान, इंदोर येथे एमबीए अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. तिच्या या यशामुळे विद्यालयाच्या शिरपेच्यात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

राणीने बारावी (वर्ष 2022) मध्ये कम्प्युटर सायन्स शाखेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर बी.टेक पदवी संपादन केली. लहानपणापासूनच अभ्यासाची आवड, जिद्द आणि चिकाटी यांच्या जोरावर तिने सातत्याने मेहनत घेतली आणि आज त्या कष्टांचे फळ तिला मिळाले आहे.

नांदखेड या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबातील राणी ही भारतीय प्रबंध संस्थान, इंदोर येथे एमबीए करण्यासाठी निवड होणारी गावातील पहिली मुलगी ठरली आहे. “प्रामाणिक प्रयत्नांनीच स्वप्ने साकार होतात” या विश्वासावर तिने वाटचाल करत यश संपादन केले.

तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल बेरार एज्युकेशन सोसायटी, पातूरचे व्यवस्थापक विजयसिंह गहिलोत, सचिव स्नेह प्रभादेवी गहिलोत, प्राचार्य अंशुमान सिंह गहिलोत, उपप्राचार्य एस. बी. चव्हाण, उपमुख्याध्यापिका आर. एस. ढेंगे, पर्यवेक्षिका पी. एम. कारस्कर, पर्यवेक्षक एस. आर. मोखाडे, वर्गशिक्षक प्रा. विपिन सिंह गहलोत, संगणक प्रा. व्ही. आर. शर्मा तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. राणी इंगळे (Rani Ingale) हिने आपल्या यशाचे श्रेय विद्यालयाचे प्राचार्य तसेच आई-वडिलांना दिले आहे.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
पातूरमध्ये घरफोडी; ५५ हजारांचा मुद्देमाल लांबवला

पातूरमध्ये घरफोडी; ५५ हजारांचा मुद्देमाल लांबवला

Patur burglary case: शहरातील सैदू प्लॉट-मुजावरपुरा परिसरात अज्ञात चोरट्यांनी घराचे लोखंडी गेट व बेडरूमचे कुलूप तोडून रोख रकमेसह चांदीचे दागिने असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना

Sep 28, 2026
नदीजोड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हायवेच्या दराने मोबदला द्या

नदीजोड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हायवेच्या दराने मोबदला द्या

नदीजोड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हायवेच्या दराने मोबदला द्यावा, तसेच पातूर तालुक्याच्या सिंचनासाठी विवरा धरणाचा प्रकल्पात समावेश करावा, अशी आमदार नितीनबापू देशमुख यांची मागणी.

Sep 18, 2026
संपूर्ण राज्यात पावसाचा मोठा खंड; पातूर तालुक्यात पिके पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर

संपूर्ण राज्यात पावसाचा मोठा खंड; पातूर तालुक्यात पिके पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर

​​​​​​​देशात यावर्षी अल निनोमुळे पावसाच्या प्रमाणात मोठी तूट दिसून येत आहे.

Sep 09, 2026
पातूर तालुक्यात सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची तयारी; १० सप्टेंबरला तहसील कार्यालयात प्रक्रिया

पातूर तालुक्यात सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची तयारी; १० सप्टेंबरला तहसील कार्यालयात प्रक्रिया

Patur Gram Panchayat Election: अकोला जिल्ह्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरपंच पदांच्या आरक्षण प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून, पातूर तालुक्यासाठी सरपंच पदाच्या आरक्षण

Sep 07, 2026