पेडगाव ग्रामपंचायत

पेडगाव ग्रा.पं. च्या मयत कंत्राटी कर्मचार्‍याच्या वारसांना ५० लाखांची मदत

Pedgaon Grampanchayat : महाराष्ट्र सरकाराने कोविड-१९ दरम्यान कंत्राटी कर्मचारी स्व. प्रसाद बाबूराव गायकवाड यांच्या कुटुंबाला ५० लाख रुपयांची मदत देण्यात आली.

पेडगाव ग्रा.पं. च्या मयत कंत्राटी कर्मचार्‍याच्या वारसांना ५० लाखांची मदत

Pedgaon Grampanchayat

परभणीतील पाथरी मतदार संघाचे आ. राजेश विटेकर यांच्या सहकार्याने कुटुंबाला मिळाला आधार ...!
कोविड-१९ कर्तव्य बजावताना मृत्यू

परभणी (Pedgaon Grampanchayat ) : तालुक्यातील पेडगाव ग्रामपंचायतीचे कंत्राटी पाणीपुरवठा कर्मचारी स्व. प्रसाद बाबूराव गायकवाड यांच्या वारसांना अखेर ५ वर्षांनंतर महाराष्ट्र शासनाकडून ५० लाख रुपयांची सानुग्रह आर्थिक मदत मंजूर झाली आहे. आ. राजेश विटेकर यांच्या सहकार्याने आणि राष्ट्रवादीचे पाथरी विधानसभा अध्यक्ष संतोष देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पिडित कुटूंबियाना आधार मिळाला आहे. 

कोविड-१९ (कोरोना) संबंधित कर्मचार्‍याचे  कर्तव्य बजावताना  २१ मे  २०२१ मध्ये निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाला मदत मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. ग्रामविकास विभागाने २९ मार्च रोजी पारित केलेल्या शासन निर्णयानुसार ही आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. या (Pedgaon Grampanchayat)  निर्णयाची प्रत राष्ट्रवादीचे नेते संतोष देशमुख यांच्या हस्ते स्व. गायकवाड यांच्या पत्नी रुक्मिणीबाई प्रसादराव गायकवाड यांना देण्यात आली.

यावेळी आ. राजेश विटेकर यांनी दूरध्वनीवरून कुटुंबाशी संवाद साधत त्यांना धीर दिला.  याप्रसंगी गायकवाड कुटूंबातील सदस्यांसह पेडगांवचे चेअरमन दिपक देशमुख, बाळासाहेब देशमुख, प्रा.रवी मोरे, माजी जि.प.सदस्य मुंजाभाऊ गायकवाड, उपसरपंच गोपाळ देशमुख, (Pedgaon Grampanchayat)  ग्रा.पं.सदस्य दिपक देशमुख, पुरुषोत्तम देशमुख, चेतन देशमुख, अमोल देशमुख, फकीर गायकवाड, दिपक गायकवाड, श्रीरंग देशमुख, लक्ष्मण गायकवाड, पांडुरंग देशमुख, उद्धव गायकवाड, मधुकर गायकवाड, नितीन गायकवाड, संजय गायकवाड यांच्यासह गावकर्‍यांची उपस्थिती होती.

या आर्थिक मदतीमुळे गायकवाड कुटुंबाला मोठा आधार मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.  मागील चार वर्षांपासून सुरू असलेल्या पाठपुराव्यामुळे, दिवंगत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून २९ मे २०२० च्या शासन निर्णयाच्या अधीन राहून ही मदत मंजूर करण्यात आली होती.

संबंधित सामग्री

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

१४ आमदार, २ खासदार मतदानापासून वंचित; शिक्षण कमी असल्याने मतदार यादीत नाव नाही

नागपूर पदवीधर मतदारसंघात १४ आमदार आणि २ खासदार मतदान करू शकणार नाहीत. बावनकुळे, नाना पटोले, वडेट्टीवारांसह अनेक नेते यादीत.

Oct 07, 2026
पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026