Protest Permission

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाला पोलिसांचा नकार; आझाद मैदानाची परवानगी रद्द

मनोज जरांगे पाटील यांच्या १९ सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील उपोषणाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली. कायदा-सुव्यवस्था आणि गणेशोत्सवाचे कारण पुढे केले.

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाला पोलिसांचा नकार; आझाद मैदानाची परवानगी रद्द

१९ सप्टेंबरच्या उपोषणासाठी मागितली होती परवानगी; कायदा-सुव्यवस्था आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा निर्णय

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील प्रस्तावित आंदोलनाला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. आझाद मैदानावर १९ सप्टेंबर रोजी उपोषण करण्यासाठी त्यांनी मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितली होती. आंदोलनादरम्यान सर्व अटी व शर्तींचे पालन केले जाईल, असे हमीपत्रही त्यांनी पोलिसांना दिले होते. मात्र, आझाद मैदान पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे.

दक्षिण मुंबईतील शाळा, रुग्णालये, व्यवसाय, न्यायपालिका, सार्वजनिक वाहतूक आणि सार्वजनिक आरोग्य यांसारख्या दैनंदिन व्यवस्थेवर आंदोलनामुळे परिणाम होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, या कारणास्तव आझाद मैदान येथे आमरण उपोषण व आंदोलनासाठी मागितलेली परवानगी नाकारण्यात आली आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू बिडकर यांनी यासंदर्भातील पत्र दिले आहे. आता मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन न करण्याबाबत पोलिसांकडून नोटीस बजावली जाणार आहे.

पोलिसांनी यापूर्वी झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाचाही संदर्भ दिला आहे. त्या आंदोलनावेळी मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम झाला होता. सीएसएमटी परिसर तसेच महानगरपालिका मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला होता. मोठ्या संख्येने मराठा आंदोलक रस्त्यावर उतरल्याने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान निर्माण झाले होते.

गेल्या आंदोलनावेळी मुंबई पोलिसांनी काही अटी व शर्तींसह परवानगी दिली होती. त्यामध्ये आझाद मैदानावर ५ हजार बांधव उपस्थित राहतील, अशी अट होती. मात्र, प्रत्यक्षात या संख्येपेक्षा अधिक आंदोलक जमा झाले होते. याच पूर्वानुभवाचा दाखला देत यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आल्याचे समजते.

दरम्यान, मुंबईत गणेशोत्सवही मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. गणेशोत्सवादरम्यान शहरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. मुंबई ही कायम राष्ट्रविघातक शक्तींच्या निशाण्यावर राहिलेली असल्याने अप्रिय घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून दरवर्षी सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध उपाययोजना केल्या जातात.

अशा परिस्थितीत जरांगे पाटील यांच्या प्रस्तावित आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यास सार्वजनिक सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही पोलिसांच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था आणि सार्वजनिक सुरक्षिततेचा विचार करून पोलिसांनी १९ सप्टेंबरच्या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.

संबंधित सामग्री

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026
अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून ३ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप; उर्वरित २५ हजार रुपये घेताना तिघांना अंधेरी पोलिसांनी अटक केली.

Oct 04, 2026
CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026