बैलगाडी रेडियम स्टिकर

अपघात टाळण्यासाठी बैलगाड्यांना लावले परावर्तक रेडियम स्टिकर; पोलीस निरीक्षक डोंगरे यांची मोहीम 

Bailgadi Radium Sticker: वळणावरील रस्त्यावर व अपघात क्षेत्र असलेल्या ठिकाणी यापूर्वीच ब्लिकर्स लाईट लावण्यात आले होते. तसेच चार चाकी वाहनाला परावर्तक रेडियम स्टिकर लावण्यात आले.

अपघात टाळण्यासाठी बैलगाड्यांना लावले परावर्तक रेडियम स्टिकर; पोलीस निरीक्षक डोंगरे यांची मोहीम 

Bailgadi Radium Sticker

औंढा नागनाथ (Bailgadi Radium Sticker) : तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गावर रस्ते सुरक्षा आणि अपघात प्रतिबंधाला प्राधान्य देत औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. वळणावरील रस्त्यावर व अपघात क्षेत्र असलेल्या ठिकाणी यापूर्वीच ब्लिकर्स लाईट लावण्यात आले होते. तसेच चार चाकी वाहनाला परावर्तक रेडियम स्टिकर लावण्यात आले. यानंतर आता बैलगाडीलाही परावर्तक रेडियम स्टिकर लावण्यात येत आहेत लावलेले ब्रेकर्स लाईट व रेडियम स्टिकर रात्रीच्या वेळी चमकतात व सहज दिसतात त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होत आहे. 

तालुक्यातील जिंतूर, वसमत,हिंगोली रोडवरील चिमेगाव, गोळेगाव,माथा, नागेशवाडी, पिंपळदरी फाटा, देवाळा, सिद्धेश्वर फाटा, हिवरा जाटू, रामेश्वर सह विविध ठिकाणी असलेल्या वळण रस्त्यावर तसेच अपघात क्षेत्र असलेल्या ठिकाणी इब्लिकर्स लाईट लावण्यात आले त्यानंतर आता बैलगाडीलाही परावर्तक रेडियमचे स्टिकर लावण्याचा अभिनव उपक्रम पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांनी हाती घेतला असून तालुक्यातील हिवरा जाटू भागात मार्गावरून जाणाऱ्या (Bailgadi Radium Sticker) बैलगाडीला परावर्तन स्पीकर लावण्यात आले आहे यावेळी पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस,जमादार रविकांत हरकळ, शाहेद सय्यद, किशोर पारीसकर,वाहतूक पोलीस वसंत चव्हाण, दिनकर पोले, अभिजीत कोळेकर यांच्यासह पोलीस कर्मचारी यांची उपस्थिती होती.

संबंधित सामग्री

ई-चालानाचा दंड न भरल्यास वाहनधारकांना बसणार मोठा फटका!

ई-चालानाचा दंड न भरल्यास वाहनधारकांना बसणार मोठा फटका!

Vehicle E-challan: वाहतूक नियमांचे उल्लंघन करून आकारण्यात आलेला ई-चालानाचा दंड वेळेत न भरल्यास वाहनधारकांच्या अडचणी वाढणार आहेत. बकाया वाहतूक दंडाची प्रभावीपणे वसुली करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय

Oct 02, 2026
ई-चलनाकडे दुर्लक्ष केलंय? सुप्रीम कोर्टाने सुचवले १० कडक उपाय; वीज बिलापासून वाहन जप्तीपर्यंत पर्याय

ई-चलनाकडे दुर्लक्ष केलंय? सुप्रीम कोर्टाने सुचवले १० कडक उपाय; वीज बिलापासून वाहन जप्तीपर्यंत पर्याय

₹२० हजार कोटींच्या ई-चलन थकबाकीवर सुप्रीम कोर्टाच्या १० सूचना; RC, DL, PUC, Parivahan आणि वाहन जप्तीपर्यंत पर्याय.

Sep 29, 2026
अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

Maharashtra Road Accident: राज्य रस्ते सुरक्षा परिषद बैठक, या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात 1.17 लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात 50 हजार 488 जणांचा मृत्यू झाला आहे.

Sep 28, 2026
नाकाबंदी दरम्यान १३१ वाहनांवर कारवाई; १ लाख १२ हजारांचा दंड

नाकाबंदी दरम्यान १३१ वाहनांवर कारवाई; १ लाख १२ हजारांचा दंड

कळमनुरी पोलिसांची नाकाबंदी; १३१ वाहनांवर कारवाई करून १ लाख १२ हजारांचा दंड वसूल. विनाहेल्मेट, ट्रिपल सीट आणि परवान्याविना वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई.

Sep 21, 2026
शेकडो मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर; नगरपंचायतीने पाठवली केवळ १० जनावरे!

शेकडो मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर; नगरपंचायतीने पाठवली केवळ १० जनावरे!

कोरची शहरात शेकडो मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर झाला असून, चार-पाच वर्षांपासून निवेदने देऊनही समस्या कायम आहे. नगरपंचायतीने केवळ १० जनावरे गोशाळेत पाठवल्याने नागरिक संतप्त आहेत.

Sep 10, 2026