संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ; भाजप जिल्हाध्यक्षांकडून 100 कोटींच्या अब्रूनुकसानीची नोटीस

वादग्रस्त वक्तव्ये आणि कृतींमुळे सातत्याने चर्चेत राहणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

संजय गायकवाड यांच्या अडचणीत वाढ; भाजप जिल्हाध्यक्षांकडून 100 कोटींच्या अब्रूनुकसानीची नोटीस

Political Controversy

विजयराज शिंदे यांचा कायदेशीर इशारा; वकील असीम सरोदे यांची पॉक्सो, अॅट्रॉसिटी आणि मानवाधिकार उल्लंघनाच्या गुन्ह्यांची मागणी

बुलढाणा (Political Controversy) : वादग्रस्त वक्तव्ये आणि कृतींमुळे सातत्याने चर्चेत राहणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. महायुतीतील मित्रपक्ष भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने त्यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीची नोटीस पाठवल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे.

काही दिवसांपूर्वी दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तकाच्या प्रकाशकाशी फोनवरून झालेल्या शिवीगाळ प्रकरणामुळे संजय गायकवाड यांच्यावर राज्यभरातून टीका झाली होती. या घटनेनंतर पक्ष नेतृत्वानेही नाराजी व्यक्त करत त्यांना सूचना दिल्याची चर्चा होती. त्यातच आता भाजपच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षांनी त्यांच्याविरोधात कायदेशीर पाऊल उचलले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार विजयराज शिंदे यांच्याबाबत संजय गायकवाड यांनी 6 एप्रिल आणि 10 एप्रिल रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदांमध्ये गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. या आरोपांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते.

या पार्श्वभूमीवर विजयराज शिंदे यांनी वकील असीम सरोदे यांच्या माध्यमातून संजय गायकवाड यांना 100 कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीची नोटीस बजावली आहे. तसेच 15 दिवसांच्या आत सार्वजनिकरीत्या माफी मागण्याची मागणीही नोटीसमध्ये करण्यात आली आहे.

याच प्रकरणात वकील असीम सरोदे यांनी बुलढाणा पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून संजय गायकवाड यांनी पॉक्सो, अॅट्रॉसिटी आणि मानवाधिकाराशी संबंधित कायद्यांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात संबंधित कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या घडामोडींमुळे संजय गायकवाड पुन्हा एकदा राजकीय आणि कायदेशीर वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत.

दरम्यान, संजय गायकवाड यांचे नाव यापूर्वीही अनेक वादांमुळे चर्चेत आले आहे. आमदार निवासातील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेनंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. तसेच 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाच्या प्रकाशकाला केलेल्या शिवीगाळीनंतर बुलढाण्यात त्यांच्या विरोधात आंदोलनही छेडण्यात आले होते. जिल्ह्यातील भाजप नेत्यांशी असलेले त्यांचे मतभेदही वेळोवेळी चर्चेत राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर विजयराज शिंदे यांनी पाठविलेल्या अब्रूनुकसानीच्या नोटीसमुळे या वादाला नवे वळण मिळाले आहे.

आता या नोटीसला संजय गायकवाड कोणती भूमिका घेतात, सार्वजनिक माफी मागतात की कायदेशीर मार्ग स्वीकारतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत गर्जना मोर्चा; राज ठाकरेंनी SIR रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली.

Oct 04, 2026
लुकआऊट सर्क्युलर, कर्जप्रकरण अन् पासपोर्ट; नितेश राणेंना अखिल चित्रेंनी मागितली उत्तरे

लुकआऊट सर्क्युलर, कर्जप्रकरण अन् पासपोर्ट; नितेश राणेंना अखिल चित्रेंनी मागितली उत्तरे

नितेश राणेंविरोधात लुकआऊट सर्क्युलरचा अखिल चित्रेंचा दावा. DHFL कर्जप्रकरण, 38 गुन्हे आणि पासपोर्टवरून चित्रेंनी सवाल उपस्थित केले.

Oct 03, 2026