Poor Quality Work

पिंपळदरी-फुलदाभा मार्गावरील वृक्ष लागवडीचा लाखो रुपयांचा निधी वाया; दुसऱ्याच दिवशी झाडे भुईसपाट

औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी ते फुलदाभा या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा दोन दिवसांपूर्वी मोठ्या थाटात वृक्ष लागवड करण्यात आली होती.

पिंपळदरी-फुलदाभा मार्गावरील वृक्ष लागवडीचा लाखो रुपयांचा निधी वाया; दुसऱ्याच दिवशी झाडे भुईसपाट

Poor Quality Work

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी ते फुलदाभा या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा दोन दिवसांपूर्वी मोठ्या थाटात वृक्ष लागवड करण्यात आली होती. पर्यावरण संवर्धन आणि रस्त्याचे सौंदर्य वाढावे या उद्देशाने शासनाच्या निधीतून ही लागवड करण्यात आली होती. प्रत्येक झाडाला संरक्षणासाठी जाळी आणि लोखंडी पाईपही बसवण्यात आले होते. या कामावर लाखो रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, या कामाचा दर्जा किती निकृष्ट होता, हे दुसऱ्याच दिवशी उघड झाले.

लागवडीनंतर अवघ्या २४ तासांतच बहुतांश झाडे उन्मळून पडली असून काही झाडे मोडून रस्त्याच्या कडेला पडलेली आहेत. अनेक ठिकाणी जाळ्या आणि लोखंडी पाईपही जागेवरून निखळल्याचे दिसून आले. पाऊस किंवा वाऱ्यामुळे नव्हे, तर कामातील हलगर्जीपणा आणि निकृष्ट साहित्य वापरामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

या प्रकारामुळे केवळ शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया गेला नसून पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशालाही तडा गेला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

याबाबत सामाजिक कार्यकर्ते बापुराव घोंगडे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. लाखो रुपयांचा निधी खर्च करून करण्यात आलेली वृक्ष लागवड दुसऱ्याच दिवशी नष्ट होणे म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी असल्याचे त्यांनी म्हटले. या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी अधिकारी आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच, वाया गेलेल्या झाडांच्या जागी दर्जेदार पद्धतीने पुन्हा वृक्ष लागवड करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

घटनास्थळी पाहणी केल्यानंतर स्थानिक नागरिकांनीही या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. शासनाच्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या योजनांची अशी अवस्था होत असल्यास पर्यावरण संवर्धनाच्या घोषणा केवळ कागदावरच राहतील, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

 

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
औंढा नागनाथ येथे चारा टंचाई निवारणासाठी आढावा बैठक संपन्न 

औंढा नागनाथ येथे चारा टंचाई निवारणासाठी आढावा बैठक संपन्न 

Aundha Nagnath Fodder Scarcity Relief: आगामी काळातील संभाव्य चारा टंचाईवर वेळीच मात करण्यासाठी आणि पशुधनासाठी चाऱ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी पंचायत समिती, औंढा नागनाथ येथे आज जिल्हा परिषद..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026