Power Transformer

अन्... रात्रीतून उभारला नवीन रोहित्र; सोनखेड परिसराचा वीजपुरवठा पूर्ववत

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहरातील सोनखेड परिसरातील वीज रोहित्र (डीपी) दोन दिवसांपूर्वी जळाल्याने अर्धा सोनखेड तसेच तांडा परिसर अंधारात बुडाला होता.

अन्... रात्रीतून उभारला नवीन रोहित्र; सोनखेड परिसराचा वीजपुरवठा पूर्ववत

Power Transformer

नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांच्या पाठपुराव्याला यश; दोन दिवसांनंतर नागरिकांना दिलासा

परभणी (Power Transformer) : परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहरातील सोनखेड परिसरातील वीज रोहित्र (डीपी) दोन दिवसांपूर्वी जळाल्याने अर्धा सोनखेड तसेच तांडा परिसर अंधारात बुडाला होता. सलग दोन दिवस वीजपुरवठा खंडित राहिल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांना ही माहिती मिळताच त्यांनी तातडीने पाठपुरावा सुरू केला. महावितरणने दखल घेत रात्रीतून नवीन रोहित्र बसविले. त्यामुळे या भागातील वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला आहे.

शहरातील नादुरुस्त डीपीबाबत त्रस्त नागरिकांनी प्रभाकर सिरसाठ यांच्याकडे व्यथा मांडली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर नगराध्यक्ष परमेश्वर कदम आणि गटनेते हाजी सद्दामभाई हुसेन यांनी महावितरण विभागाशी तातडीने संपर्क साधून नवीन रोहित्र उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

नगराध्यक्ष परमेश्वर कदम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि हाजी सद्दामभाई हुसेन यांच्या आक्रमक भूमिकेमुळे महावितरण प्रशासनाने तातडीने हालचाली करत परभणी येथून नवीन रोहित्र मागवले. रात्रीच नवीन डीपी बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला असून, दोन दिवसांपासून अंधारात असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रोहित्र बसविण्याचे काम महावितरणचे कर्मचारी शेख यकीन, विकास, मोरे तसेच इतर कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर पूर्ण केले. यावेळी नगरसेवक शुभम कदम, अक्षय कदम, मुस्तफा भाई, शकील भाई, चांद पटेल यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित सामग्री

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण झाली. जनतेच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी देशसेवा आणि ‘राष्ट्र प्रथम’चा दृष्टिकोन मांडला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026