Pregnant Deer

हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर गाभण हरणीला वाहनाची धडक; प्राणीमित्रांकडून सन्मानाने अंत्यसंस्कार

हिंगोली ते नांदेड जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर आज सकाळी एक दुर्दैवी घटना घडली.

हिंगोली-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर गाभण हरणीला वाहनाची धडक; प्राणीमित्रांकडून सन्मानाने अंत्यसंस्कार

Pregnant Deer

हिंगोली : हिंगोली ते नांदेड जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर आज सकाळी एक दुर्दैवी घटना घडली. कळमनुरी तालुक्यातील जरोडा गावाजवळ रस्ता ओलांडत असलेल्या एका गाभण हरणीला भरधाव वाहनाने धडक दिली. या धडकेत हरणीचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस ठाण्याचे खोकले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्याचवेळी परिसरातील काही प्राणीमित्रांनाही या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता हरणीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

माणुसकीचे उदाहरण देत प्राणीमित्रांनी मृत हरणीचा कोणताही अपमान न करता तिच्यावर सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. स्थानिकांच्या मदतीने सर्व विधी पार पाडण्यात आले.

या कार्यात सुनील माखने आणि बाबासाहेब पुंडगे यांनी विशेष सहकार्य केले. त्यांच्या पुढाकारामुळे मृत हरणीला योग्य प्रकारे अखेरचा निरोप देण्यात आला.

राष्ट्रीय महामार्गावर वन्यजीवांचा वावर असलेल्या ठिकाणी वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे, असे आवाहन यावेळी प्राणीमित्रांनी केले. अन्यथा अशा निष्पाप जीवांचे बळी जात राहतील, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026