Ramai Gharkul Yojana

अकोल्यात रमाई घरकूल योजनेला धक्का; ११३ घरकुलांची मंजुरी रद्द, ३.६० कोटींचा निधी शासनाकडे परत

अनुसूचित जाती घटकातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या रमाई घरकूल योजनेला अकोला महापालिका क्षेत्रात अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसल्याचे समोर आले आहे

अकोल्यात रमाई घरकूल योजनेला धक्का; ११३ घरकुलांची मंजुरी रद्द, ३.६० कोटींचा निधी शासनाकडे परत

Ramai Gharkul Yojana

१,२२५ मंजूर घरकुलांपैकी ९२२ पूर्ण; १९० घरांचे बांधकाम सुरू, जागृतीअभावी लाभार्थ्यांना योजनेचा लाभ घेता न आल्याची चर्चा

अकोला : अनुसूचित जाती घटकातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या रमाई घरकूल योजनेला अकोला महापालिका क्षेत्रात अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसल्याचे समोर आले आहे. महापालिका क्षेत्रासाठी मंजूर करण्यात आलेल्या १ हजार २२५ घरकुलांपैकी ९२२ घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तर १९० घरांची कामे सध्या सुरू आहेत. दुसरीकडे, मंजुरी मिळाल्यानंतरही बांधकामाला सुरुवात न करणाऱ्या ११३ लाभार्थ्यांची घरकुले अखेर रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे या घरकुलांसाठी राखीव असलेला तब्बल ३ कोटी ६० लाख रुपयांचा निधी शासनाकडे परत जमा करण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.

पंतप्रधान आवास योजना सुरू होण्यापूर्वी अनुसूचित जाती प्रवर्गातील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना निवारा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शासनाने २००२ मध्ये रमाई घरकूल योजना सुरू केली. या योजनेंतर्गत अकोला महापालिका हद्दीत एकूण १ हजार २२५ घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती.

योजनेचा लाभ मिळण्यासाठी संबंधित लाभार्थ्याकडे किमान ३२५ चौरस फूट जागा असणे आवश्यक होते. तसेच लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील असणे हा देखील महत्त्वाचा निकष होता.

घरकुल योजनेबाबत पुरेशी जनजागृती झाली का?

योजनेचे लाभार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अनुसूचित जाती घटकातील असल्याने त्यांच्यापर्यंत योजनेची माहिती, अटी आणि बांधकाम प्रक्रियेबाबत प्रभावीपणे जनजागृती होणे अपेक्षित होते. मात्र, महापालिकेकडून आवश्यक पातळीवर जागृती करण्यात आली नसल्याची चर्चा आहे. परिणामी, काही लाभार्थ्यांना योजनेचे निकष पूर्ण करता आले नाहीत, तर काहींनी मंजुरी मिळूनही बांधकाम सुरू केले नाही. त्यामुळे अखेरीस घरकुलांच्या मंजुरी रद्द झाल्याचे चित्र आहे.

लाभार्थ्याला दोन लाख रुपयांचे अनुदान

रमाई घरकूल योजनेअंतर्गत प्रत्येक मंजूर लाभार्थ्याला घर बांधण्यासाठी दोन लाख रुपयांचा निधी दिला जातो. हे अनुदान चार टप्प्यांमध्ये वितरित केले जाते. मात्र, घरकुलाच्या पायाभरणीसाठी सुरुवातीला लागणारा खर्च लाभार्थ्याने स्वतः करणे अपेक्षित आहे.

महापालिका क्षेत्रातील मंजूर घरकुलांपैकी आतापर्यंत ९२२ घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. याशिवाय १९० घरांचे बांधकाम सुरू असून ही कामे प्रगतिपथावर आहेत.

वारंवार सूचना देऊनही बांधकामाला सुरुवात नाही

दरम्यान, मंजुरी मिळाल्यानंतरही ११३ लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष बांधकाम सुरू केले नाही. महापालिकेने संबंधित लाभार्थ्यांना अनेक वेळा पत्रे पाठवून घरकुलाचे काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, या सूचनांनंतरही कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर प्रशासनाने संबंधित ११३ घरकुलांची मंजुरी रद्द केली.

या घरकुलांसाठी उपलब्ध असलेला ३ कोटी ६० लाख रुपयांचा निधी आता शासनाकडे जमा करावा लागणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांसाठी असलेल्या योजनेचा अपेक्षित लाभ सर्व मंजूर लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला का, तसेच योजनेबाबत अधिक प्रभावी जनजागृतीची गरज होती का, यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026