Road Potholes

आदित्य ठाकरेंनी खड्डा पाहिला अन् प्रशासनाची धावपळ; परतण्याआधीच रस्ता चकाचक!

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर असून, मुंबई-गोवा महामार्गाच्या पाहणीदरम्यान त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी परिसराला भेट दिली.

आदित्य ठाकरेंनी खड्डा पाहिला अन् प्रशासनाची धावपळ; परतण्याआधीच रस्ता चकाचक!

Road Potholes

मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करताना आदित्य ठाकरेंनी लोटे एमआयडीसीतील रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या दुरवस्थेकडे वेधले लक्ष

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे कोकण दौऱ्यावर असून, मुंबई-गोवा महामार्गाच्या पाहणीदरम्यान त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसी परिसराला भेट दिली. स्थानिक रस्त्यांची स्थिती आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेताना त्यांनी उद्योजकांच्या अडचणीही जाणून घेतल्या. या दौऱ्यातील एका घटनेची सध्या चर्चा होत आहे. आदित्य ठाकरे यांनी पाहणी केलेला मोठा खड्डा प्रशासनाने त्यांच्या बैठकीनंतर ते परत येण्यापूर्वीच बुजवून रस्त्याची डागडुजी केली.

खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरातील आवाशी-गुणदे मध्यवर्ती शाखेसमोरील रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून मोठा खड्डा पडला होता. कोकण दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे यांनी या ठिकाणी थांबून रस्त्याची पाहणी केली. त्यानंतर ते पुढील बैठकीसाठी रवाना झाले. दरम्यान, त्यांच्या बैठकीचा कार्यक्रम सुरू असतानाच प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. आदित्य ठाकरे माघारी येण्यापूर्वीच संबंधित खड्डा बुजवण्यात आला आणि रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली.

लोटे एमआयडीसीतील परिस्थितीवरून आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवरही टीका केली. एमआयडीसी परिसरातील रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांची अवस्था खराब असल्याचे सांगत त्यांनी याचा थेट परिणाम उद्योगांवर होत असल्याचे म्हटले. सुविधांच्या अभावामुळे लोटे एमआयडीसीमधील उद्योग बाहेर जाण्याच्या स्थितीत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, गणेशोत्सव काही दिवसांवर आला असताना मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दाही पुन्हा ऐरणीवर आला आहे. कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाच्या असलेल्या या महामार्गावरील रखडलेली कामे आणि खड्ड्यांचा प्रश्न यामुळे चर्चेत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यानंतर आदित्य ठाकरे यांचा दौरा होत असल्याने या दौऱ्याला राजकीयदृष्ट्याही महत्त्व प्राप्त झाले आहे.

शिवसेनेतील फुटीनंतर कोकणातील ठाकरे गटासमोर संघटनात्मक आव्हान निर्माण झाले आहे. मुंबईनंतर कोकण हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे स्थानिक प्रश्नांना हात घालून जनतेशी थेट संवाद साधणे आणि पक्षाची संघटनात्मक ताकद पुन्हा वाढवणे, या दृष्टीने आदित्य ठाकरेंचा कोकण दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

संबंधित सामग्री

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत गर्जना मोर्चा; राज ठाकरेंनी SIR रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली.

Oct 04, 2026
लुकआऊट सर्क्युलर, कर्जप्रकरण अन् पासपोर्ट; नितेश राणेंना अखिल चित्रेंनी मागितली उत्तरे

लुकआऊट सर्क्युलर, कर्जप्रकरण अन् पासपोर्ट; नितेश राणेंना अखिल चित्रेंनी मागितली उत्तरे

नितेश राणेंविरोधात लुकआऊट सर्क्युलरचा अखिल चित्रेंचा दावा. DHFL कर्जप्रकरण, 38 गुन्हे आणि पासपोर्टवरून चित्रेंनी सवाल उपस्थित केले.

Oct 03, 2026