सकल मराठा समाज

वसमत येथे सकल मराठा समाजाच्या वतीने काढण्यात आली प्रतिकात्मक अंत्ययात्रा 

Sakal Maratha Samaj: वसमत येथे  मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शासन आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिके विरोधात सकल मराठा समाजाच्या वतीने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या प्रतीकात्मक अंत्ययात्रा

वसमत येथे सकल मराठा समाजाच्या वतीने काढण्यात आली प्रतिकात्मक अंत्ययात्रा 

Sakal Maratha Samaj

वसमत (Sakal Maratha Samaj) : वसमत येथे  मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर शासन आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिके विरोधात सकल मराठा समाजाच्या वतीने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. या आंदोलनात मोठ्या संख्येने सकल मराठा समाज बांधव सहभागी झाले होते. 
 
वसमत मध्ये सकल मराठा  समाजाच्या (Sakal Maratha Samaj) वतीने ‘तिरडी आंदोलन’करण्यात आले.  मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ 3 सप्टेंबर रोजी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. वसमत शहरातुन मुख्य मार्गाने ही अंत्ययात्रा निघाली शहरातील सत्यनारायण टॉकीज, झेंडा चौक, मामा चौक, ते  शहर पोलीस स्टेशन, गवळी मारुती मंदिर, ते तहसील कार्यालय येथे प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.

तहसील कार्यालय परिसरात प्रतीकात्मक अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित मराठा समाज बांधवांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या आंदोलनात मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते. वसमत शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाच्या निमित्ताने पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता, शांततेत आंदोलन पार पडले.

टैग्स: Sakal Maratha Samaj

संबंधित सामग्री

राजकीय अनुषंगाने सभा मेळाव्यावर सकल मराठा समाजाचा बहिष्कार

राजकीय अनुषंगाने सभा मेळाव्यावर सकल मराठा समाजाचा बहिष्कार

Sakal Maratha Samaj: मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील हे सध्या अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करीत आहेत. अनेक दिवस उलटले तरी शासन सकारात्मक निर्णय घेत नाही

Sep 08, 2026
वसमत मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने मोटरसायकल व ट्रॅक्टर रॅली 

वसमत मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने मोटरसायकल व ट्रॅक्टर रॅली 

Sakal Maratha Samaj Rally: वसमत येथे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करणारे मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून वसमत येथे मोटरसायकल व ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली खांडेगाव सर्कल

Sep 07, 2026
वसमत तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन

वसमत तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन

Sakal Maratha Samaj: वसमत येथे सकल मराठा समाज बांधवांची बैठक पार पडली या बैठकीत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून आठवडाभर शांततेच्या मार्गाने आंदोलन

Sep 06, 2026
कौठा पाटीवर सकल मराठा समाजातर्फे रास्तारोको

कौठा पाटीवर सकल मराठा समाजातर्फे रास्तारोको

Sakal Maratha Samaj: मराठा योद्धा मनोज  जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवण्यासाठी, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने  रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Sep 04, 2026
सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या बंदची हाक

सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या बंदची हाक

Sakal Maratha Samaj: संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ४ सप्टेंबर रोजी हिंगोली शहर व तालुका कडकडीत बंद ठेवण्याबाबत सकल मराठा समाज

Sep 03, 2026