डॉ. बाबासाहेब आंबेडकर

संविधान कायदा, कलमाची माहिती देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Dr. Babasaheb Ambedkar: कन्हान येथे आंबेडकर व फुले यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन. ॲड.पुजा आडे यांनी संविधानाच्या मूलभूत तत्त्वांवर प्रकाश टाकला.

संविधान कायदा, कलमाची माहिती देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Dr. Babasaheb Ambedkar

संविधानातील कलम १४ ते ३२ नागरिकांना समानता , स्वातंत्र्य आणि शोषणाविरुद्ध हक्क प्रदान करतात: ॲड.पुजा आडे

कन्हान (Dr. Babasaheb Ambedkar) : कन्हान , कांद्री शहर विकास मंच द्वारे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमाचे आयोजन संजीवन नगर येथे करण्यात आले. कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित संस्थेचे मार्गदर्शक भरत सावळे , ॲड.पुजा आडे , नगरसेवक राकेश लांजेवार यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर , तथागत गौतम बुद्ध , महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन आणि बुद्ध वंदना घेऊन , केक कापुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

यावेळी ॲड.पुजा आडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत संविधान कायदा,कलमाची माहिती दिली . त्यांनी म्हटले कि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेवर आधारित संविधान दिले . २, ६ , कायद्याचे राज्य , कलम १४-३२ अंतर्गत मूलभूत अधिकार , आणि महिला-दलित-शोषितांना समान हक्क मिळवून देण्यात त्यांचे योगदान अमूल्य आहे , असे ॲड.पुजा आडे यांनी म्हटले.

संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री (Law Minister) म्हणून त्यांनी देशाची कायदेशीर चौकट तयार केली . संविधानातील कलम १४ ते ३२ नागरिकांना समानता , स्वातंत्र्य आणि शोषणाविरुद्ध हक्क प्रदान करतात . कलम ३२: या कलमाला बाबासाहेबांनी 'संविधानाचा आत्मा' म्हटले आहे , कारण याद्वारे नागरिक मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात . हिंदू कोड बिल , कामगारांचे हक्क आणि महिलांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी संघर्ष केला ."शिक्षित व्हा, संघटित व्हा, संघर्ष करा" असा संदेश डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला , असे प्रतिपादन ॲड.पुजा आडे यांनी केले . कार्यक्रमात महिलांनी गीत सादर केले आणि संविधानाचे वाचन करुण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली . कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन शहर विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर यांनी केले.

या (Dr. Babasaheb Ambedkar) प्रसंगी कन्हान शहर विकास मंच चे संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर , मार्गदर्शक भरत सावळे , नारायण गजभिए , ज्ञानेश्वर ऊके , निखिल मेश्राम , माहेर इंचुलकर , निखिल तांडेकर , शुभम बावनकर , प्रमोद गिऱ्हे , विकास सोनवाने , प्रदीप बावने , अर्चना तांडेकर , सुषमा मस्के , जयश्री गडपाडे , मीना गिऱ्हे , रंजना किरपाने , सिध्दार्थ घरडे , बबन नारनवरे , राम पाटील, प्रकाश थोरात , स्वप्नील बेलेकर , मनीष शंभरकर , सौरभ घरडे , वैभव थोरात , माया बेलेकर , कल्पना नाईक , वनिता लांजेवार , स्वीटी पाटील , सुरेखा बोरकर , वनमाला चिमनकर , सुशिला खडसे , अर्चना थोरात , अर्चना नारनवरे , किरण हुमने , गौतमी नारनवरे , प्रमीला घरडे , निरुपा बेलेकर सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. .

संबंधित सामग्री

शाळेकडे जाणारा कच्चा रस्त्याचे डांबरी किंवा सिमेंट रस्त्या बनविण्याची मागणी

शाळेकडे जाणारा कच्चा रस्त्याचे डांबरी किंवा सिमेंट रस्त्या बनविण्याची मागणी

Kanhan Public School Road: पाटील नगर च्या मागे प्रभाग क्र. १७ कांद्री येथिल वच्छलागोपी पब्लिक स्कूल या शाळेत दोनशे पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत असुन शाळेकडे जाणारा रस्ता कच्चा असुन..

Oct 07, 2026
सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण झाली. जनतेच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी देशसेवा आणि ‘राष्ट्र प्रथम’चा दृष्टिकोन मांडला.

Oct 07, 2026
अवैध कोळसा चोरीचा ट्रक पकडुन कन्हान पोलिसांनी केली कारवाई

अवैध कोळसा चोरीचा ट्रक पकडुन कन्हान पोलिसांनी केली कारवाई

Kanhan illegal coal theft: अवैध कोळसा वाहतुकी विरोधात कन्हान पोलिसांनी धडक कारवाई करित कोळशाने भरलेला संशयित ट्रक जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिस रातील अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ

Oct 05, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026
२५ गौवंशांची अवैध वाहतुक उघड; ८ जनावरांचा मृत्यु

२५ गौवंशांची अवैध वाहतुक उघड; ८ जनावरांचा मृत्यु

Kanhan cattle Illegal transport: स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण पोलि सांनी कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई करत गौवंशांची अवैध वाहतुक करणारा टाटा चा बारा चाकी ट्रक पकडला.

Sep 30, 2026