श्री संत गजानन महाराज पालखी

श्री संत गजानन महाराज पालखीचे रिसोड शहरात आगमन; भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Sant Gajanan Maharaj Palkhi: श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र पालखीचे रिसोड शहरात उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले. पालखी आगमनानिमित्त संपूर्ण शहर भक्तिमय वातावरण

श्री संत गजानन महाराज पालखीचे रिसोड शहरात आगमन; भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Sant Gajanan Maharaj Palkhi

रिसोड (Sant Gajanan Maharaj Palkhi) : श्री संत गजानन महाराजांच्या पवित्र पालखीचे रिसोड शहरात उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले. पालखी आगमनानिमित्त संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणाने भारावून गेले होते. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि जयघोषात पालखी शिस्तबद्ध पद्धतीने शहरात दाखल झाली.पालखीच्या स्वागतासाठी विविध सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत भक्तांसाठी पिण्याचे पाणी, फराळ तसेच अन्य आवश्यक साहित्याचे वाटप केले. सामाजिक बांधिलकी जपत अनेक स्वयंसेवकांनी सेवाभावाने सहभाग नोंदविला.

पालखी दर्शनासाठी रिसोड शहरासह ग्रामीण भागातून आणि इतर जिल्ह्यांतूनही मोठ्या संख्येने भाविक शहरात दाखल झाले. (Sant Gajanan Maharaj Palkhi) पालखी मार्गावर ठिकठिकाणी भक्तांनी फुलांची उधळण करत आणि महाराजांचा जयघोष करत स्वागत केले.भक्तांच्या उत्साहामुळे शहरातील वातावरण पूर्णपणे भक्तिरसात न्हाऊन निघाले होते. सर्वत्र “गण गण गणात बोते” चा जयघोष घुमत असून श्रद्धा, भक्ती आणि सेवाभावाचा सुंदर संगम पाहायला मिळाला. सदर पालखीच्या शहर मध्ये दाखल होण्यापासून बाजार समितीमध्ये मुक्कामापर्यंत पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी वारंवार चोरांपासून सावधान राहण्याच्या सूचना देण्यात येत होत्या.

रिसोड शहरातील नगरपरिषद पोलीस स्टेशन तर्फे वारकऱ्यांना विविध प्रकारचे साहित्य वाटप करण्यात आले नगरपरिषद व पोलीस स्टेशन यांनी आपापले स्टॉल लावून सदर साहित्य वाटप केले यावेळी ठाणेदार रामेश्वर चव्हाण, मुख्याधिकारी सतीश शेवदा नगराध्यक्ष भगवानदादा क्षीरसागर नगरसेवक व नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते

रिसोड शहरात पालखीचे (Sant Gajanan Maharaj Palkhi) आगमनापूर्वी भाविकांनी रस्त्यावर स्वच्छता करून रांगोळी काढत फटाक्याची आतिषबाजी करून पालखीचे भव्य स्वागत केले.यावेळी पालखी ही शहरातील लोणी फाटा येथे असताना वरून राजाने पावसाची हजेरी लावली या ठिकाणी वातावरण अगदी थंडगार झाले होते. दिवसभरच्या उकाड्यानंतर वारकरी व भक्तांना या पावसामुळे दिलासा मिळाला

संबंधित सामग्री

दसरा-दिवाळीच्या तोंडावर डाळी महागल्या! चणा, तूर, मूग, वाटाण्याच्या दरांत मोठी वाढ

दसरा-दिवाळीच्या तोंडावर डाळी महागल्या! चणा, तूर, मूग, वाटाण्याच्या दरांत मोठी वाढ

Consumers Hit by Inflation: विविध खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी डाळी, तेल, तूप आणि अन्य किराणा वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. बाजारात कडधान्यांच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या खर्चात भर

Sep 30, 2026
अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

Maharashtra Road Accident: राज्य रस्ते सुरक्षा परिषद बैठक, या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात 1.17 लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात 50 हजार 488 जणांचा मृत्यू झाला आहे.

Sep 28, 2026
श्री गजानन महाराज संस्थानचे दातृत्व; दुष्काळ निवारणासाठी 1 कोटी 11 लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

श्री गजानन महाराज संस्थानचे दातृत्व; दुष्काळ निवारणासाठी 1 कोटी 11 लाखांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

Shri Gajanan Maharaj Sansthan: श्री गजानन महाराज संस्थान हे केवळ धार्मिक श्रद्धास्थान नसून सामाजिक उत्तरदायित्व जपणारी अग्रगण्य संस्था आहे. यापूर्वीही राज्यावर आलेल्या विविध नैसर्गिक आपत्ती

Sep 27, 2026
‘ज्ञानेश कुमार गद्दार’; 48 तासांत राजीनामा द्या, अन्यथा देशभर आंदोलन!

‘ज्ञानेश कुमार गद्दार’; 48 तासांत राजीनामा द्या, अन्यथा देशभर आंदोलन!

CJP Abhijit Dipke: कॉकरोच जनता पार्टीने निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कामकाजावर अनेक गंभीर आरोप केले आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

Sep 24, 2026
ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाचा कडक बडगा; लाऊडस्पीकर लावण्याआधी ₹1 लाख भरा! नियमभंग झाल्यास डिपॉझिट जप्त

ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाचा कडक बडगा; लाऊडस्पीकर लावण्याआधी ₹1 लाख भरा! नियमभंग झाल्यास डिपॉझिट जप्त

लाऊडस्पीकर परवानगीसाठी मंडळांना ₹1 लाख, व्यक्तींना ₹50 हजार डिपॉझिट. नियमभंग झाल्यास रक्कम जप्त; फटाके आणि लेझर लाईटवरही हायकोर्टाचे निर्बंध.

Sep 24, 2026