जांब मार्ग वृक्षतोड

सावरखेड–पाचरण जांब मार्गावर वृक्षतोड, चोरी व जंगलातील आगीचे संकट

Jamb Marg tree felling: सावरखेड ते पाचरण जांब मार्गावरील वृक्षतोड, वृक्ष चोरी व जंगलातील आगीमुळे पर्यावरणीय समतोल बिघडला आहे. स्थानिक नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

सावरखेड–पाचरण जांब मार्गावर वृक्षतोड, चोरी व जंगलातील आगीचे संकट

Jamb Marg tree felling

नाकेबंदीची नागरिकांची मागणी

पातूर (Jamb Marg tree felling) : सावरखेड ते पाचरण जांब या ग्रामीण मार्गावरील जंगल परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड व वृक्ष चोरी सुरू असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकाराकडे वन विभागाने तात्काळ लक्ष देऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडील काही दिवसांत या परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणावर आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. या आगीत अनेक वनस्पती, झाडे तसेच वन्यजीव व पक्ष्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जंगलातील जैवविविधतेवर याचा गंभीर परिणाम होत असून भविष्यात पर्यावरणीय संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळेस काही संशयास्पद वाहनांची ये-जा वाढली असून या वाहनांद्वारे बेकायदेशीरपणे लाकूड वाहतूक केली जात असल्याचा संशय आहे. त्यामुळे या मार्गावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक बनले आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी काही ठोस उपाययोजना सुचवल्या आहेत. सावरखेड येथून जंगलात प्रवेश करताना एक नाका उभारण्यात यावा, तसेच पाचरण जांब बाजूने येणाऱ्या मार्गावरही स्वतंत्र नाकेबंदी करण्यात यावी. या  (Jamb Marg tree felling) दोन्ही ठिकाणी विशेषतः रात्रीच्या वेळेस कडक तपासणी करूनच वाहनांना प्रवेश दिला जावा, अशी मागणी जोर धरत आहे.

तसेच, जंगलातील आग नियंत्रणासाठी विशेष पथके तैनात करणे, गस्त वाढवणे आणि वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची वन विभागाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

संबंधित सामग्री

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

फटाक्यांच्या स्फोटातील गंभीर जखमी अग्निशमन दलातील कर्मचार्‍याचा उपचारा दरम्यान मृत्यू

Hingoli firecracker fire Death: फटाक्याच्या गोदामाला आग, हिंगोली नगर परिषद अग्निशमन दलातील कर्मचारी दिलीप दोडके याचा लातूर रूग्णालयात उपचारा दरम्यान मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला...

Oct 07, 2026
हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

हिंगोलीतील काळ रात्र: फटाक्यांच्या आगीत दोघांचा बळी

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्लीमध्ये सोमवारी रात्रीच्या सुमारास बासटवार यांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत फटाक्यांच्या स्फोटामुळे आगीचे रौद्ररूप धारण झाले होते.

Oct 06, 2026
फटाक्यांचा अवैध साठा व विक्री करू नका; पोलिस प्रशासनाचे व्यापार्‍यांना आवाहन

फटाक्यांचा अवैध साठा व विक्री करू नका; पोलिस प्रशासनाचे व्यापार्‍यांना आवाहन

Illegal firecracker stockpile: हिंगोली शहरातील कपडा गल्ली येथे फटाक्याच्या गोदामाला आग लागून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कळमनुरी पोलीस स्टेशनकडून जाहीर सूचना जारी करण्यात आली आहे.

Oct 06, 2026
फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

फटाक्यावरील छापेमारीची प्रशासनाला उशिराने आली जाग

Hingoli Firecracker Raid: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली  येथे सोमवारी रात्रीच्या सुमारास फटाक्याची साठवणूक केलेल्या गोदामाला भीषण आग लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १२ जण जखमी झाले.

Oct 06, 2026
हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हिंगोलीतील फटाका दुर्घटना अत्यंत दुर्दैवी: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Hingoli Firecracker Accident: हिंगोली शहरातील मारवाडी गल्ली परिसरात फटाक्यांच्या साठवणुकीच्या ठिकाणी लागलेली आग अत्यंत दुर्दैवी व गंभीर आहे. या दुर्घटनेत प्राथमिक माहितीनुसार दोन नागरिकांचा मृत्यू..

Oct 06, 2026