Secret Visit

कोटगुलमध्ये आमदारांचा ‘गुप्त’ दौरा वादात; ट्रान्सफॉर्मर उद्घाटनावरून संताप, जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्षाचा आरोप

आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांचा कोरची तालुक्यातील अतिदुर्गम कोटगुल परिसरातील दौरा चांगलाच वादग्रस्त ठरला आहे.

कोटगुलमध्ये आमदारांचा ‘गुप्त’ दौरा वादात; ट्रान्सफॉर्मर उद्घाटनावरून संताप, जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्षाचा आरोप

Secret Visit

कोरची : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांचा कोरची तालुक्यातील अतिदुर्गम कोटगुल परिसरातील दौरा चांगलाच वादग्रस्त ठरला आहे. कोणतीही अधिकृत पूर्वसूचना न देता गुपचूप पद्धतीने दौरा करून केवळ पक्षीय भेटीगाठी घेतल्याचा आरोप होत असून, गावातील ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदारांच्या दौऱ्याची कोणतीही माहिती प्रशासन, ग्रामपंचायत किंवा सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आली नव्हती. प्रोटोकॉलनुसार ग्रामपंचायतीला माहिती देणे अपेक्षित असताना कोटगुल व अरमुरकसा ग्रामपंचायतींना पूर्णतः अंधारात ठेवण्यात आले. या दौऱ्यात सार्वजनिक जनसंवाद टाळून केवळ काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबतच बैठक घेतल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

दौऱ्यातील सर्वात वादग्रस्त बाब म्हणजे देहानटोला येथील वीज ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन. ग्रामपंचायत अरमुरकसा हद्दीतील या ट्रान्सफॉर्मरसाठी सरपंचांनी ग्रामसभेत वारंवार ठराव मंजूर करून विद्युत विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र उद्घाटनाच्या वेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही निमंत्रण देण्यात आले नाही.

एका वीज वितरण कंपनीने बसवलेल्या ट्रान्सफॉर्मरच्या उद्घाटनासाठी आमदार स्वतः उपस्थित राहिले, पण गावच्या प्रथम नागरिकालाच डावलण्यात आल्याने, "हा कार्यक्रम नेमका कोणासाठी?" असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

कोटगुल परिसरातील आदिवासी बांधव अनेक गंभीर समस्यांनी त्रस्त असताना आमदारांनी त्यावर एक शब्दही उच्चारला नसल्याने संताप वाढला आहे.

प्रमुख मुद्दे

  • अवैध कसीनो व खुलेआम दारू विक्री; युवापिढी धोक्यात.
  • आश्रम शाळेतील इयत्ता ९ वीतील विद्यार्थिनीशी संबंधित गंभीर प्रकरण प्रलंबित.
  • वनपट्टेधारक शेतकऱ्यांचे धान ऑनलाइन नोंद नसल्याने खरेदी रखडली; बोनसपासून वंचित.
  • आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेची गुप्त निवडणूक; जुनेच वादग्रस्त व्यवस्थापक.

"ट्रान्सफॉर्मर उद्घाटनाला वेळ आहे, पण जनतेच्या अडचणी ऐकायला वेळ नाही का?" असा रोखठोक सवाल कोटगुलकरांनी उपस्थित केला आहे.

ईश्वर कोरेटी, रामलाल मुलेटी, नारद फुलारे, विनोद कोरेटी, चिंताराम सोनफूल, ऐनसिंग कोरेटी, प्रेमलाल उसेंडी, अविनाश हारामी, गजेंद्र मडावी, अर्जुन मुलेटी, पुरुषोत्तम कोल्हे, शंकर सोरी, पवन मडावी, राजेश नैताम, देवराम हिडको, कमल नैताम, सौ. गिरजाबाई कोरेटी, सौ. केवराबाई सोनफुल, सौ. संगीताबाई कोरेटी आदी ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आमदारांनी तातडीने भूमिका स्पष्ट करून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. या गंभीर आरोपांनंतर आमदार रामदास मसराम काय स्पष्टीकरण देतात आणि जिल्हा प्रशासन कोटगुलच्या प्रश्नांकडे कितपत लक्ष देते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी पुन्हा आक्रमक; निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चाची तयारी

राहुल गांधी-प्रियंका गांधींच्या ताब्यानंतर INDIA आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधक पुन्हा निवडणूक आयोगाकडे मोर्चा काढणार.

Oct 07, 2026
मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याविरोधात FIR; आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेशाचा आरोप

आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींसह विरोधी नेत्यांविरोधात दिल्ली पोलिसांनी FIR दाखल केला.

Oct 07, 2026
‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य की जंगलराज?’- वर्षा गायकवाड

‘महाराष्ट्रात कायद्याचे राज्य की जंगलराज?’- वर्षा गायकवाड

Congress MP Varsha Gaikwad: नाशिकहून शेकडो किलोमीटरची पायपीट करत आपल्या मागण्यांसाठी मुंबईत दाखल झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईवरून काँग्रेस खासदार प्रा. वर्षा गायकवाड..

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026