दिव्यांग रास्ता रोको

दिव्यांगांचा ५ टक्के निधी तातडीने वाटप करा; अन्यथा २७ ऑगस्टला रास्ता रोको

Divyangg Rasta Roko: सेनगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींनी शासन निर्णयानुसार दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेला पाच टक्के निधी तातडीने वितरित करावा, तसेच त्यांना शासनाच्या नियमानुसार आवश्यक सोयी-सुविधा

दिव्यांगांचा ५ टक्के निधी तातडीने वाटप करा; अन्यथा २७ ऑगस्टला रास्ता रोको

Divyangg Rasta Roko

सेनगाव पंचायत समितीसमोर आंदोलनाचा इशारा; प्रहार संघटनेचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

सेनगाव (Divyangg Rasta Roko) : सेनगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींनी शासन निर्णयानुसार दिव्यांग बांधवांसाठी राखीव असलेला पाच टक्के निधी तातडीने वितरित करावा, तसेच त्यांना शासनाच्या नियमानुसार आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रहार संघटनेने केली आहे. या मागणीसंदर्भात पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

प्रहार संघटना जिल्हा प्रमुख विजय वानखेडे, तालुका प्रमुख बालाजी गायकवाड यांच्या सह कार्यकत्यांनी  दिलेल्या  निवेदनात म्हटले आहे की, सेनगाव पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या ज्या ग्रामपंचायतींनी सन २०२५-२६ तसेच त्यापूर्वीच्या कालावधीतील दिव्यांग बांधवांसाठीचा शासन नियमानुसार पाच टक्के निधी वितरित केलेला नाही, अशा ग्रामपंचायतींना पंचायत समितीने तातडीने आदेश द्यावेत. संबंधित निधीचा योग्य पद्धतीने विनियोग करून दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्काच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, पंचायत समितीमार्फत आदेश देऊनही निधीचे वाटप करण्यात आले नाही किंवा शासन निर्णयानुसार दिव्यांगांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत, तर संबंधित ग्रामपंचायतींवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.

मागण्यांची तातडीने दखल घेऊन कार्यवाही न झाल्यास २७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सेनगाव पंचायत समिती कार्यालयासमोर सेनगाव-रिसोड महामार्गावर दिव्यांग बांधवांना सोबत घेऊन लोकशाही व शांततेच्या मार्गाने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रहार संघटनेने दिला आहे. या (Divyangg Rasta Roko) आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी पंचायत समिती प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 292 कोटींची मदत मंजूर

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 292 कोटींची मदत मंजूर

Flood-Affected Farmers Financial Aid: राज्यात जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 291कोटी 91 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

Nov 05, 2026
खापरदरी ते सावरगाव-कान्होबा रस्त्याचे काम तातडीने सुरू करा; अन्यथा चिखलागड फाटा येथे रास्ता रोको आंदोलन

खापरदरी ते सावरगाव-कान्होबा रस्त्याचे काम तातडीने सुरू करा; अन्यथा चिखलागड फाटा येथे रास्ता रोको आंदोलन

Manora Road Blockade Protest: तालुक्यातील खापरदरी ते सावरगाव - कान्होबा या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सात दिवसाच्या आत प्रत्यक्ष सुरू करावे, अन्यथा ८ नोव्हेंबर रोजी तीव्र रास्ता रोको आंदोलन..

Nov 02, 2026
‘मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मालक नाहीत’; संजय राऊतांचा सरकारवर चौफेर हल्लाबोल

‘मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मालक नाहीत’; संजय राऊतांचा सरकारवर चौफेर हल्लाबोल

संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल; शेतकरी, ठाणे प्रकरण, ५०० कोटींची कथित ऑडिओ क्लिप आणि २,६३७ झाडांच्या मुद्द्यावरून सवाल.

Oct 28, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाने ठाणे पेटले; समर्थकांची दगडफेक, पोलिस जखमी

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाने ठाणे पेटले; समर्थकांची दगडफेक, पोलिस जखमी

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावरून ठाण्यात तणाव. समर्थकांचे १६ तास आंदोलन, मानपाड्यात दगडफेक आणि जाळपोळ; काही पोलिस जखमी.

Oct 28, 2026
लाडक्या बहिणींनंतर आता लाडक्या विद्यार्थिनींना पैसे! वर्षाला ६ हजार रुपये मिळणार; नवी योजना सुरू

लाडक्या बहिणींनंतर आता लाडक्या विद्यार्थिनींना पैसे! वर्षाला ६ हजार रुपये मिळणार; नवी योजना सुरू

उल्हासनगरमध्ये ज्योति कालानी लाडकी विद्यार्थिनी योजना सुरू. सातवी ते बारावीच्या मुलींना वर्षाला ६ हजार रुपये मिळणार. १९ हजार नोंदणी; उद्घाटनाला भाजपची गैरहजेरी चर्चेत.

Oct 27, 2026