दागिने चोर महिला

महिलांवर पाळत ठेवून दागिने चोरणारी महिला चिखली डी.बी. पथकाच्या जाळ्यात

Jewel thief woman: चिखली पोलिसांनी महिला चोरट्या सुवर्णा काकासाहेब काळेला डी.बी. पथकाने छत्रपती संभाजीनगर येथून पकडले. त्यांनी चोरीस गेलेले सुमारे ३१,९५० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले.

महिलांवर पाळत ठेवून दागिने चोरणारी महिला चिखली डी.बी. पथकाच्या जाळ्यात

Jewel thief woman

 

छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात; चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने जप्त

चिखली (Jewel thief woman) : महिलांवर पाळत ठेवून त्यांच्या पर्समधील मौल्यवान दागिने लंपास करणाऱ्या एका सराईत महिला चोरट्यास चिखली पोलिसांच्या डी.बी. पथकाने छत्रपती संभाजीनगर येथून ताब्यात घेतले असून तिच्याकडून चोरीस गेलेले सुमारे ३१ हजार ९५० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ मे २०२६ रोजी फिर्यादी महिला आपल्या वडिलांसोबत चिखली येथे जुने दागिने मोडून नवीन दागिने तयार करण्यासाठी आल्या होत्या. नवीन बनविलेले तीन चांदीचे जोडवे (वजन ५१.४१ ग्रॅम) तसेच दोन सोन्याचे डोरले व चार मणी असा एकूण ३१ हजार ९५० रुपयांचा ऐवज त्यांनी कापडी पिशवीत ठेवून ती वायरच्या पिशवीत ठेवली होती.

यानंतर शहरातील मनीषा स्टील होम या (Jewel thief woman) दुकानात खरेदी करत असताना त्यांच्या मागे उभी असलेल्या एका अनोळखी महिलेने संधी साधून पिशवीतील दागिने चोरून नेले. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३९८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक अमोल गवई यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध

पोलीस निरीक्षक भुषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान गुप्त माहितीच्या आधारे संबंधित महिला जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चंदनापुरी परिसरात वास्तव्यास असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस पथकाने जालना व छत्रपती संभाजीनगर येथे शोधमोहीम राबविली. दरम्यान, संबंधित महिला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालय परिसरात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. (Jewel thief woman) संशयास्पद हालचाली करत असताना तिला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान तिने आपले नाव सुवर्णा काकासाहेब काळे (वय ४०), रा. पाथर्डी रोड, शेवगाव, जि. अहमदनगर, ह.मु. चंदनापुरी, ता. अंबड, जि. जालना असे सांगितले.

सुरुवातीला तिने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र कसून चौकशीनंतर तिने चोरीची कबुली दिली. पुढील तपासासाठी तिला चिखली येथे आणण्यात आले. महिला पोलिस व पंचांच्या उपस्थितीत घेतलेल्या अंगझडतीमध्ये चोरीस गेलेले दोन सोन्याचे डोरले, (Jewel thief woman) चार सोन्याचे मणी आणि तीन चांदीचे जोडवे असा संपूर्ण मुद्देमाल आढळून आला. त्यानंतर तिला अटक करण्यात आली.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भुषण गावंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात पोलीस नाईक अमोल गवई, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत धंदर, अजय इटावा, पंढरीनाथ मिसाळ, राहुल पायघन, निलेश सावळे तसेच महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल सूर्यकला म्हस्के यांचा सहभाग होता.

संबंधित सामग्री

उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

मराठवाडा पदवीधर मतदार यादीत ‘उद्धव मस्के’ऐवजी उद्धव ठाकरे यांचे नाव आल्याचा दावा. दिलीप घुगे यांनी प्रशासनाकडे तक्रार केली.

Oct 05, 2026
निदा खानच्या अडचणी वाढल्या; ८ महिन्यांच्या गर्भवती असताना पतीकडून घटस्फोटासाठी अर्ज, १६ ऑक्टोबरला न्यायालयात हजेरी

निदा खानच्या अडचणी वाढल्या; ८ महिन्यांच्या गर्भवती असताना पतीकडून घटस्फोटासाठी अर्ज, १६ ऑक्टोबरला न्यायालयात हजेरी

नाशिक धर्मांतर प्रकरणातील निदा खानसमोर वैवाहिक संकट. आठ महिन्यांची गर्भवती असताना पतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला असून १६ ऑक्टोबरला कोर्टात हजेरी आहे.

Oct 04, 2026
महाराष्ट्रातील ५ विधानपरिषद निवडणुकांचे बिगुल; २३ ऑक्टोबरला मतदान, २७ तारखेला मतमोजणी

महाराष्ट्रातील ५ विधानपरिषद निवडणुकांचे बिगुल; २३ ऑक्टोबरला मतदान, २७ तारखेला मतमोजणी

महाराष्ट्रातील ५ विधानपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर; २९ सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज, २३ ऑक्टोबरला मतदान आणि २७ ऑक्टोबरला मतमोजणी.

Sep 22, 2026
जरांगेंच्या मागण्यांवर फडणवीसांचे भाष्य; १३ पैकी १२ मागण्या मान्य, एका मागणीसमोर कायदेशीर अडचण

जरांगेंच्या मागण्यांवर फडणवीसांचे भाष्य; १३ पैकी १२ मागण्या मान्य, एका मागणीसमोर कायदेशीर अडचण

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी फडणवीसांनी जरांगेंच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य असल्याचे सांगितले. दुष्काळ, शेतकरी आणि मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावरही त्यांनी भाष्य केले.

Sep 17, 2026
छत्रपती संभाजीनगर मध्ये लग्नाचा तगादा अन् धमक्यांनी घेतला जीव? तरुणीच्या आत्महत्येनंतर संशयिताला अटक

छत्रपती संभाजीनगर मध्ये लग्नाचा तगादा अन् धमक्यांनी घेतला जीव? तरुणीच्या आत्महत्येनंतर संशयिताला अटक

लग्नासाठी वारंवार फोन करून दबाव आणि धमक्या दिल्याच्या आरोपानंतर गोंदेगावातील १९ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. सोयगाव पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर १० तासांत करण वाघला अटक केली.

Sep 12, 2026