सिद्धेश्वर धरणाचे पाणी केळी पाझर तलावात सोडण्याची मागणी

सिद्धेश्वर धरणातून केळी पाझर तलावात पाणी सोडावे, या प्रमुख मागणीसाठी केळी पाझर तलाव पाणी हक्क संघर्ष समितीची जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

सिद्धेश्वर धरणाचे पाणी केळी पाझर तलावात सोडण्याची मागणी

Siddheshwar Dam

जिल्हाधिकाऱ्यांसोबत संघर्ष समितीची सकारात्मक चर्चा

हिंगोली (Siddheshwar Dam) : सिद्धेश्वर धरणातून केळी पाझर तलावात पाणी सोडावे, या प्रमुख मागणीसाठी केळी पाझर तलाव पाणी हक्क संघर्ष समितीची जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. शेतकरी व स्थानिक नागरिकांच्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

बैठकीला पाटबंधारे विभागाचे अधिकारी गरुड तसेच जिल्हा अभियंता विक्रम पत्की उपस्थित होते. समितीच्या प्रतिनिधींनी केळी परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्या प्रशासनासमोर मांडल्या. सिद्धेश्वर धरणाचे पाणी केळी पाझर तलावात सोडल्यास सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो, अशी ठाम भूमिका समितीने मांडली.

याशिवाय, तलावाच्या पाणी हक्कासंदर्भातील विविध मुद्द्यांवर तसेच भविष्यातील पाणी नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. समितीच्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने ऐकून घेत संबंधित विभागांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

पाणी हक्काच्या प्रश्नावर प्रशासन सकारात्मक असून शेतकरी व नागरिकांच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

बैठकीस केळी पाझर तलाव पाणी हक्क संघर्ष समितीचे बी.डी. दादा बांगर, विलास आघाव, निवासपाटील सांगळे, सरपंच बालाजी सांगळे, अमोल सांगळे, एकनाथ नागरे, रामजी घुगे, दिनकर खिल्लारे, भास्कर आघाव, सोपान आघाव आणि शुभम सांगळे उपस्थित होते.

केळी पाझर तलावाच्या पाणी हक्कासाठी एकजुटीने व सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026