हिंगोली स्मार्ट मीटर

जून्या मीटर सोबत तक्रारीही गेल्या;  स्मार्ट मीटर बसल्याचा परिणाम

Hingoli Smart Meter: हिंगोली जिल्ह्यात स्मार्ट मीटरची स्थापना करण्यात आली आहे, ज्यामुळे वीज बिलाबाबतच्या तक्रारी कमी झाली आहेत. पारंपरिक मीटरच्या स्थानापासून डिजिटल मीटर

जून्या मीटर सोबत तक्रारीही गेल्या;  स्मार्ट मीटर बसल्याचा परिणाम

Hingoli Smart Meter

 

डिजीटल व अचूक रिडींगमुळे संशयच संपला

हिंगोली (Hingoli Smart Meter) : हिंगोली जिल्ह्यात महावितरणने राबवलेल्या स्मार्ट मीटर मोहिमेचे सकारात्मक परिणाम आता दिसू लागले आहेत. जुन्या पारंपरिक मीटरच्या जागी अत्याधुनिक स्मार्ट मीटर बसवल्यानंतर वीज बिलासंदर्भातील ग्राहकांच्या तक्रारी जवळपास संपुष्टात आल्या आहेत. यामुळे महावितरणच्या मीटर टेस्टिंग विभागातील कामाचा ताण कमालीचा कमी झाला आहे.

पूर्वी ‘मीटर जास्त पळते’, ‘वापर नसताना बिल जास्त येते’ अशा तक्रारी घेऊन ग्राहकांची महावितरण कार्यालयात रोज गर्दी असायची. जुने मीटर तपासणीसाठी प्रयोगशाळेत रांगा लागत होत्या. मात्र स्मार्ट मीटर बसवल्यापासून हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. (Hingoli Smart Meter) डिजिटल आणि अचूक रीडिंगमुळे बिलाबाबतचा संशयच संपला असून ग्राहक- महावितरण मधील वादाचे प्रसंग थांबले आहेत. आता महावितरणची कार्यपद्धतीही बदलली आहे.

कर्मचारी जागेवर जाऊन पाहणी करतात आणि फक्त तांत्रिक बिघाड किंवा शंका असल्यासच मीटर तपासणीसाठी आणले जाते. ग्राहकाने स्वतः लेखी तक्रार दिल्यासच मीटरची पडताळणी केली जाते. सरसकट मीटर टेस्टिंगची पद्धत बंद झाल्याने कर्मचार्‍यांचा वेळ वाचतो आहे आणि ग्राहकांचे कार्यालयातील हेलपाटेही थांबले आहेत. मीटर तपासणी विभागात पूर्वी मीटरचा ढीग असायचा, तिथे आता शुकशुकाट आहे. 

केवळ अत्यावश्यक प्रकरणांमधील मोजकीच मीटर तपासली जात आहेत. (Hingoli Smart Meter) वीज वापराचे अचूक वर्गीकरण होत असल्याने ग्राहकांचा महावितरणवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. हिंगोलीत महावितरणचा हा तंत्रज्ञानाधारित बदल ग्राहकांसाठी दिलासादायक ठरत आहे.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026