Solapur-Pune Highway

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; कार कंटेनरखाली अडकली, तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

सोलापूर-पुणे महामार्गावर मोडनिंबजवळ कार-कंटेनर अपघातात कर्ण पवार यांचा मृत्यू; अनिकेत धोत्रे आणि रोहित मोरे गंभीर जखमी.

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; कार कंटेनरखाली अडकली, तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Solapur-Pune Highway

मोडनिंबजवळील सापटणे हद्दीत कारची कंटेनरला पाठीमागून धडक; अनिकेत धोत्रे आणि रोहित मोरे गंभीर जखमी

सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावर मोडनिंबजवळील सापटणे हद्दीत कार आणि कंटेनरच्या धडकेत भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत मोहोळ येथील कर्ण पवार या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अनिकेत लक्ष्मण धोत्रे आणि रोहित विजय मोरे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

मोडनिंबजवळील सापटणे हद्दीतील एचपी पेट्रोल पंपाजवळ हा अपघात घडला. समोरून जाणाऱ्या कंटेनरला कारने मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर कारचा पुढील भाग मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाला आणि कार कंटेनरखाली अडकली. त्यामुळे कारमधील तिन्ही जण आतमध्ये अडकून पडले.

घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त कार कंटेनरखालून बाहेर काढण्यात आली. त्यानंतर कारचे दरवाजे तोडून तिन्ही जखमींना बाहेर काढण्यात आले. गंभीर अवस्थेतील तिघांनाही पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या अपघातात कर्ण पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, अनिकेत लक्ष्मण धोत्रे आणि रोहित विजय मोरे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

या दुर्घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महामार्गावर मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक आणि अवजड वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी काळजीपूर्वक वाहन चालवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सोलापूर ग्रामीण पोलीस करत आहेत. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

वैद्यकीय विद्यार्थ्याला भरधाव पिकअपची धडक; अपघातातील वाहन ताब्यात घेण्यास धनज पोलिसांची टाळाटाळ!

मानोऱ्यात वैद्यकीय विद्यार्थ्याला बोलेरो पिकअपची धडक; तक्रार आणि CCTV पुरावा असूनही वाहन ताब्यात न घेतल्याचा आरोप.

Oct 03, 2026
पुण्यात स्कूल बसची दुचाकीला धडक; बहिणीच्या डोळ्यांसमोर १६ वर्षीय भावाचा मृत्यू

पुण्यात स्कूल बसची दुचाकीला धडक; बहिणीच्या डोळ्यांसमोर १६ वर्षीय भावाचा मृत्यू

पुण्यात स्कूल बसच्या धडकेत १६ वर्षीय रोहित कुदळेचा मृत्यू झाला. बहिण रिया गंभीर जखमी असून बसचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला.

Oct 01, 2026
अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

अपघातांची वाढती संख्या आणि जीवितहानी; राज्यात तीन वर्षांत अपघातांत तब्बल 50 हजारांहून अधिक मृत्यू

Maharashtra Road Accident: राज्य रस्ते सुरक्षा परिषद बैठक, या तीन वर्षांच्या कालावधीत राज्यात 1.17 लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले असून, त्यात 50 हजार 488 जणांचा मृत्यू झाला आहे.

Sep 28, 2026
ओव्हरटेकच्या नादात टिप्परची कारला धडक; मोठी दुर्घटना टळली

ओव्हरटेकच्या नादात टिप्परची कारला धडक; मोठी दुर्घटना टळली

Risod-Lonar Road Car accident: रिसोड–लोणार मार्गावर दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा ते बाराच्या सुमारास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव टिप्परने कारला धडक दिल्याची घटना मांगवाडी फाट्याजवळ

Sep 24, 2026