Stalking

शिक्षिकेचा पाठलाग करून मोबाईल क्रमांकाची मागणी; चिखलीतील तरुणाविरुद्ध गुन्हा

३८ वर्षीय शिक्षिकेचा पाठलाग करून मोबाईल क्रमांकाची मागणी केल्याप्रकरणी चिखली शहर पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध बीएनएस कलम ७८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

शिक्षिकेचा पाठलाग करून मोबाईल क्रमांकाची मागणी; चिखलीतील तरुणाविरुद्ध गुन्हा

चिखली : चिखली येथील शिक्षक कॉलनी परिसरात राहणाऱ्या ३८ वर्षीय शिक्षिकेचा पाठलाग करून त्यांच्याशी बोलण्याचा आग्रह धरत मोबाईल क्रमांकाची मागणी केल्याप्रकरणी चिखली शहर पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ७८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. २९) सकाळी ८.४५ ते ८.५० वाजण्याच्या सुमारास अर्बन विद्यानिकेतन शाळेच्या परिसरात ही घटना घडली. फिर्यादी शिक्षिका शाळेकडे जात असताना आरोपी अकील अहमद अब्दुल अहमद (रा. चिखली) याने त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर, "तुम्ही मला खूप आवडता, मला तुमच्याशी बोलायचे आहे," असे म्हणत त्याने त्यांच्याकडे मोबाईल क्रमांकाची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे घाबरलेल्या शिक्षिकेने चिखली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा क्रमांक ६४३/२०२६ भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ७८ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

या प्रकरणी पोलीस निरीक्षक भूषण गावंडे व पोलीस उपनिरीक्षक सुसर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास चतरकर करीत आहेत.

संबंधित सामग्री

चिखलीतील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

चिखलीतील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

Chikhli gangster Ishwar Dhanwate: शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चिखली पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध धडक कारवाई सुरू ठेवली आहे. अंतर्गत विविध गंभीर गुन्ह्या

Oct 06, 2026
सेवा संकल्प अभियानातून स्वच्छ चिखलीचा संदेश; माजी सैनिकांचा सन्मान

सेवा संकल्प अभियानातून स्वच्छ चिखलीचा संदेश; माजी सैनिकांचा सन्मान

Chikhli Seva Sankalp Mission: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवापर्वानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान

Oct 02, 2026
मुख्यमंत्री सहायता निधीत एक लाखांची मदत; वाढदिवसानिमित्त मुख्याधिकाऱ्यांची सामाजिक बांधिलकी

मुख्यमंत्री सहायता निधीत एक लाखांची मदत; वाढदिवसानिमित्त मुख्याधिकाऱ्यांची सामाजिक बांधिलकी

Chief Officer Prashant Bidkar: चिखली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत बिडकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीत १ लाख रुपयांची मदत जमा केली.

Oct 01, 2026
पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे धडक पाठपुरावा

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे धडक पाठपुरावा

Chikhli Farmers' Crop Loan: खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर कराव्यात, या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चा

Sep 30, 2026
‘गुंडांना ताकद देऊन बुलढाणा बसवू नका’  गायकवाडांचा महालेंवर निशाणा; संजय गायकवाड-श्वेता महाले वाद पुन्हा पेटला

‘गुंडांना ताकद देऊन बुलढाणा बसवू नका’ गायकवाडांचा महालेंवर निशाणा; संजय गायकवाड-श्वेता महाले वाद पुन्हा पेटला

बुलढाण्यात संजय गायकवाड आणि श्वेता महाले यांच्यातील वाद पुन्हा पेटला. ‘बुलढाण्याचा बिहार’ टीकेला गायकवाडांनी चिखलीतील आरोपांसह प्रत्युत्तर दिले.

Sep 30, 2026