डोंगरकडा/ रामेश्वर तांडा (School Water Protest) : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथून जवळच असलेल्या जवळा पांचाळ सर्कल मधील वडगांव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी द्या म्हणून तेथील मुजोर ग्रामसेवकाला वारंवार विनंती करूनही सदरील ग्रामसेवक आणि तत्कालीन सरपंच हे टाळाटाळ करीत असल्याने तेथील ग्रामस्थां समवेत शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांनी चक्क लुगडं नेसून आदर्श ग्रामपंचायत समोर शाळेतील विद्यार्थी, शिक्षकवृंद यांनी अनोखं आंदोलन करून ग्रामस्थ आणि प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
अधिक माहिती की वडगाव तालुका कळमनुरी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गेल्या कित्येक महिन्या पासून ग्रामपंचायत ने पिण्याचे पाणी उपलब्द्ध करून दिले नसल्याने तेथील शिक्षक, शिक्षकेत्तर आणि लहान मोठ्या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीकरावी लागत आहे त्यामुळे तेथील शिक्षकांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून अनेकवेळा ग्रामपंचायत ला विनंती करूनही तेथील सरपंच आणि मुजोर ग्रामसेवक यांनी काना डोळा केल्याने शेवटी दिनांक १२ ऑगस्ट रोजी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गंगाधर जाधव यांनी चक्क लुगडं परिधान करून शाळेतील विद्यार्थ्यां समवेत सर्व शिक्षकांनी गावात फेरी मारून पाणी द्या पाणी द्या;आम्हाला पिण्याचे पाणी द्या!अशा घोषणा देऊन संपूर्ण ग्रामस्थांचे आणि सुस्त प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले असल्याचे दिसून आले. आता पहायचं आहे की भ्रष्ट प्रशासन स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी देते की नाही.
शाळेत पिण्याच्या पाण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षाचे ग्रामपंचायत समोर अनोखे आंदोलन
School Water Protest: कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथून जवळच असलेल्या जवळा पांचाळ सर्कल मधील वडगांव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी द्या
School Water Protest
संबंधित सामग्री
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाशी संबंधित 13 FIR रद्द
NEET प्रश्नपत्रिका फुटीच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनाशी संबंधित कॉक्रोच जनता पार्टीच्या 13 एफआयआरवर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी महत्त्वाचा निर्णय दिला.
'खाऊन-पिऊन आंदोलन करा, मी चोरून खायचो आणि आंदोलन करायचो'आदिवासी विद्यार्थ्यांना नरहरी झिरवळ यांचा अजब सल्ला
पुण्यातील मांजरी परिसरात आदिवासी विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी सुरू केलेले आंदोलन आणि उपोषण १४व्या दिवशीही कायम आहे.
ग्रामविकासासाठी सरपंच संघटनेचे सीईओंना निवेदन
Village Sarpanch Association: जिल्ह्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवरील प्रशासकांना पूर्ववत अधिकार द्यावेत आणि प्रलंबित विकासकामांना गती द्यावी, या मागणीसाठी सरपंच संघटन
पेलेट गन प्रकरणावर राहुल गांधी आक्रमक; दिल्ली पोलिसांच्या DCP कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन
जंतर मंतर येथील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पेलेट गनच्या वापराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
आदिवासी समाजाला नवे नेतृत्व; राजेश हरिदास मेटांगे यांची गोंधळवाडी तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड
Rajesh Haridas Metange: आदिवासी समाजाचे नेतृत्व करणारे राजेश हरिदास मेटांगे यांची 'तंटामुक्ती समिती अध्यक्ष' म्हणून निवड गोंधळवाडी येथील गावात शांतता व एकजूटतेसाठी प्रेरक ठरली.