पातुर गॅस एजन्सी

पातुर गॅस एजन्सीसमोरील रांगांवर तहसीलदारांचा संताप

Patur Gas Agency: पातुर येथील गॅस एजन्सीसमोर लांबलचक रांगांमुळे त्रास होत असल्याने तहसीलदार डॉ. राहुल वानखडे यांनी घरपोच सिलेंडर वितरणाचे कडक आदेश दिले आहेत.

पातुर गॅस एजन्सीसमोरील रांगांवर तहसीलदारांचा संताप

Patur Gas Agency

घरपोच सिलेंडर वितरणाचे कडक आदेश

पातुर (Patur Gas Agency) : पातुर येथील गॅस एजन्सीसमोर दररोज पहाटेपासून लागणाऱ्या लांबलचक रांगांमुळे नागरिकांना होत असलेल्या गैरसोयीची दखल घेत तहसीलदार डॉ. राहुल वानखडे यांनी सोमवारी अचानक भेट देत संबंधितांवर संताप व्यक्त केला. शासनाच्या आदेशानुसार घरपोच गॅस सिलेंडर वितरण करणे बंधनकारक असताना ग्राहकांना रांगेत उभे राहण्यास भाग पाडले जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना सकाळी चार वाजल्यापासूनच (Patur Gas Agency) गॅस मिळवण्यासाठी एजन्सीसमोर रांगा लावाव्या लागत होत्या. सध्या तापमान ४२ अंशांपर्यंत पोहोचले असून, या कडक उन्हात नागरिकांना पावती मिळवण्यासाठी तासनतास थांबावे लागत असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत होता. तहसीलदारांनी एजन्सी व्यवस्थापनाला स्पष्ट निर्देश देत सांगितले की, ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीने सिलेंडर बुक करून ओटीपीच्या माध्यमातून घरपोच सेवा मिळावी. “एजन्सीसमोर रांगा का लागतात?” असा सवाल करत त्यांनी यापुढे अशी परिस्थिती दिसल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला.

याशिवाय, काही ठिकाणी (Patur Gas Agency) घरगुती गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचेही समोर आले आहे. यामुळे गॅस सिलेंडरच्या संभाव्य काळाबाजारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, तहसीलदारांच्या हस्तक्षेपानंतर आता ग्राहकांना घरपोच गॅस सिलेंडर मिळणार असल्याने रांगा टाळल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्य शासनाने उन्हाळा भक्ता व सिलेंडरचा काळाबाजार पाहता ऑनलाईन पद्धतीने (Patur Gas Agency) घरगुती गॅस सिलेंडर बुकिंग करून घरपोच सिलेंडर देण्याची आदेश दिले असून, त्या आदेशाचे पालनपात्रेतील गॅस एजन्सीने करणे सुद्धा गरजेचे आहे गॅस एजन्सी समोर यापुढे रांगा दिसल्यास क** कारवाई करण्यात येईल.
- डाँ राहुल वानखडे, तहसीलदार पातूर

यापुढे ग्राहकांनी ऑनलाइन पद्धतीने गॅस बुकिंग करावी व ओटीपी च्या माध्यमातून ऑनलाईन पैसे पेमेंट करून (Patur Gas Agency) गॅस सिलेंडर करिता नंबर लावावा प्रत्येकाला गॅस सिलेंडर खरबूज देण्यात येईल ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर डिलिव्हरी बॉय कडून सिलेंडर व रीतसर पावती ग्राहकांनी घ्यावी.
-अनिल ठाकरे, संचालक मनात्मा गँस ऐजन्सी पातूर

 

 

संबंधित सामग्री

आखाडा बाळापूर अप्पर तहसील कार्यालयासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला मोठा प्रतिसाद 

आखाडा बाळापूर अप्पर तहसील कार्यालयासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला मोठा प्रतिसाद 

Tehsildar office Hunger strike: आखाडा बाळापूर तालुका निर्मिती अप्पर तालुका घोषित करा या मागणीसाठी २ आक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आखाडा बाळापूर तालुका कृती समितीच्या वती

Oct 02, 2026
पातूरमध्ये घरफोडी; ५५ हजारांचा मुद्देमाल लांबवला

पातूरमध्ये घरफोडी; ५५ हजारांचा मुद्देमाल लांबवला

Patur burglary case: शहरातील सैदू प्लॉट-मुजावरपुरा परिसरात अज्ञात चोरट्यांनी घराचे लोखंडी गेट व बेडरूमचे कुलूप तोडून रोख रकमेसह चांदीचे दागिने असा एकूण ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवल्याची घटना

Sep 28, 2026
नदीजोड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हायवेच्या दराने मोबदला द्या

नदीजोड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हायवेच्या दराने मोबदला द्या

नदीजोड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हायवेच्या दराने मोबदला द्यावा, तसेच पातूर तालुक्याच्या सिंचनासाठी विवरा धरणाचा प्रकल्पात समावेश करावा, अशी आमदार नितीनबापू देशमुख यांची मागणी.

Sep 18, 2026
संपूर्ण राज्यात पावसाचा मोठा खंड; पातूर तालुक्यात पिके पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर

संपूर्ण राज्यात पावसाचा मोठा खंड; पातूर तालुक्यात पिके पाण्याअभावी जळण्याच्या मार्गावर

​​​​​​​देशात यावर्षी अल निनोमुळे पावसाच्या प्रमाणात मोठी तूट दिसून येत आहे.

Sep 09, 2026
पातूर तालुक्यात सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची तयारी; १० सप्टेंबरला तहसील कार्यालयात प्रक्रिया

पातूर तालुक्यात सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीची तयारी; १० सप्टेंबरला तहसील कार्यालयात प्रक्रिया

Patur Gram Panchayat Election: अकोला जिल्ह्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरपंच पदांच्या आरक्षण प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून, पातूर तालुक्यासाठी सरपंच पदाच्या आरक्षण

Sep 07, 2026