नाट्य परिषदेचे यंदाचे पुरस्कार जाहीर; २० मे रोजी वितरण

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, लातूर महानगर शाखेच्या वतीने यंदाचे रंगकर्मी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

नाट्य परिषदेचे यंदाचे पुरस्कार जाहीर; २० मे रोजी वितरण

Theatre Awards

संकर्षण कऱ्हाडे, निलम शिर्के-सामंत व प्रदीप भोकरे यांचा समावेश

लातूर (Theatre Awards) : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, लातूर महानगर शाखेच्या वतीने यंदाचे रंगकर्मी पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये अभिनेते संकर्षण कऱ्हाडे, सिने व नाट्य अभिनेत्री निलम शिर्के-सामंत आणि रंगकर्मी प्रदीप भोकरे यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे वितरण २० मे रोजी लातूर येथे समारंभपूर्वक करण्यात येणार आहे.

लातूर महानगर नाट्य परिषद शाखेकडून दरवर्षी रंगकर्मी पुरस्कार प्रदान केले जातात. यंदा स्वर्गीय रंगकर्मी बंकट पुरी पुरस्कारासाठी मराठवाड्यातील उगवता तारा म्हणून व्यावसायिक रंगभूमीवर ठसा उमटवणारे अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांची निवड करण्यात आली आहे.

राज्यात रंगमंचीय क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तीस दिला जाणारा रंगमंचीय गौरव पुरस्कार सिने व नाट्य अभिनेत्री निलम शिर्के-सामंत यांना जाहीर झाला आहे. तसेच लातूरच्या प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत होतकरू रंगकर्मीला दिल्या जाणाऱ्या स्वर्गीय विजयकुमार धायगुडे रंगकर्मी पुरस्कारासाठी प्रदीप भोकरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

या पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ अभिनेते मिलिंद शिंदे व लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बाष्टेवाड यांच्या हस्ते दि. २० मे २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता भालचंद्र ब्लड बँक, सभागृह येथे करण्यात येणार आहे.

या समारंभास लातूरकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महानगर शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

पुरस्कार निवड बैठकीस अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, लातूर महानगर शाखेचे अध्यक्ष अ‍ॅड. शैलेश गोजमगुंडे, कार्याध्यक्ष डॉ. दिपक वेदपाठक, उपाध्यक्षा अर्चना पोपडे, कोषाध्यक्ष अनील पुरी, सहकार्यवाह नागेश जाधव, कार्यकारिणी सदस्य रवी आघाव, रुपेश सूर्यवंशी, मुक्त पत्रकार अश्विनी धायगुडे-कोळेकर, बालरंगभूमी परिषद लातूर शाखेचे अध्यक्ष रणजित आचार्य, वसुधा पाटील, भीम दुनगावे आदी उपस्थित होते.

संबंधित सामग्री

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AI, डिजिटल माध्यमे, OTT आणि सोशल मीडियातील मराठी कंटेंट वाढवण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Oct 03, 2026
लातूरमध्ये दुष्काळी परिस्थितीची पाहणी; उपाययोजनांना सुरुवात, शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार असल्याची फडणवीसांची ग्वाही

लातूरमध्ये दुष्काळी परिस्थितीची पाहणी; उपाययोजनांना सुरुवात, शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार असल्याची फडणवीसांची ग्वाही

लातूरमध्ये दुष्काळी परिस्थितीची पाहणी करताना मुख्यमंत्री फडणवीसांनी उपाययोजनांना सुरुवात झाल्याचे सांगितले. मराठवाडा वॉटर ग्रीडचा डीपीआर डिसेंबरपर्यंत अपेक्षित.

Sep 23, 2026
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर RBIची कारवाई; लातूर जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून हटवले

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर RBIची कारवाई; लातूर जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून हटवले

बाबासाहेब पाटील यांच्यावर RBIची कारवाई झाली आहे. १० वर्षांच्या संचालकपदाच्या नियमाचा मुद्दा असून, निर्णयाला हायकोर्टात आव्हान देणार असल्याचे पाटील म्हणाले.

Sep 19, 2026
निलंग्यात तीन मजली इमारतीला भीषण आग; तळमजल्यावरील दुकान जळून खाक

निलंग्यात तीन मजली इमारतीला भीषण आग; तळमजल्यावरील दुकान जळून खाक

निलंग्यात तीन मजली इमारतीला मध्यरात्री भीषण आग लागली. तळमजल्यावरील दुकान जळून खाक झाले, तर पतसंस्थेच्या कार्यालयातील कागदपत्रांचेही मोठे नुकसान झाले.

Sep 18, 2026
लातूरचे शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या आत्महत्येपूर्वीचे पत्र समोर; ‘I am a good fool’ वाक्याने चर्चेला उधाण

लातूरचे शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या आत्महत्येपूर्वीचे पत्र समोर; ‘I am a good fool’ वाक्याने चर्चेला उधाण

लातूरचे शिक्षण संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या आत्महत्येपूर्वीचे पत्र समोर आले. ‘I am a good fool’ या वाक्यामुळे चर्चेला उधाण आले असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

Sep 16, 2026