नंदगाव येथे वीज पुरवठा करणारा डीपी जळून खाक

औंढा तालुक्यातील नंदगाव येथे १६ मे रोजी रात्री साडेआठ वाजता अचानक वीज पुरवठा करणाऱ्या डीपीने पेट घेतल्याने तो पूर्णपणे जळून खाक झाला.

नंदगाव येथे वीज पुरवठा करणारा डीपी जळून खाक

Transformer Fire

रात्रभर गावात अंधार; पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांची गैरसोय

नंदगाव (Transformer Fire) : औंढा तालुक्यातील नंदगाव येथे १६ मे रोजी रात्री साडेआठ वाजता अचानक वीज पुरवठा करणाऱ्या डीपीने पेट घेतल्याने तो पूर्णपणे जळून खाक झाला. यामुळे गावाचा वीज पुरवठा तात्काळ खंडित झाला. घटनेची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांना कळविण्यात आले आणि नंदगाव फाट्याहून गावाचे कनेक्शन बंद करण्यात आले. परिणामी रात्रभर गावात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. उष्णतेमुळे गावकऱ्यांना रात्र जागून काढावी लागली.

औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव येथे वीज पुरवठा करणाऱ्या डीपीला रात्री अचानक आग लागल्याने संपूर्ण गावाचा वीज पुरवठा खंडित झाला. याबाबत गावकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी वीज पुरवठा बंद केला. त्यामुळे गावात रात्रभर अंधार पसरला होता. वाढत्या उष्णतेमुळे पंखे, कुलर बंद असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेकांच्या मोबाईलला चार्जिंग नसल्याने फोन बंद पडले.

वीज नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला असून विजेवर चालणारी सर्व यंत्रे बंद पडली. रविवारी दुपारपर्यंत डीपी दुरुस्त करण्यात आलेला नव्हता.

दरम्यान, गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ बसविण्यात आलेला डीपी पाच वर्षांपासून कनेक्शनविना असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी काही नागरिकांनी वर्गणी करून गावातील काही भागात डीपीवर जोडणी घेतली होती. नुकतेच अर्ध्या गावात पाणीपुरवठा होत नसल्याने ८ मे रोजी झालेल्या ग्रामसभेत हंडा मोर्चा काढण्यात आला होता. हे प्रकरण जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले होते.

आता डीपी जळाल्याने पाणीपुरवठा किती दिवस बंद राहणार, असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. यापूर्वीही ग्रामस्थांनी वर्गणी करून दोन वर्षांत तीन वेळा डीपी बसवला होता. तात्काळ नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

संबंधित सामग्री

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

‘गाव तिथे शाळा’ला लागले ग्रहण; राज्यात पुन्हा 131 जिल्हा परिषद शाळा कायमच्या बंद!

Zilla Parishad school closed: जिल्हा परिषद शाळांची संख्या रत्नागिरी जिल्ह्यात सातत्याने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल 131 जिल्हा परिषद शाळा कायमस्वरूपी बंद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले...

Oct 07, 2026
९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

९ ते ११ परीक्षा, पण कॉम्प्युटरच नाही; महाज्योती परीक्षेवरून रोहित पवार संतापले; अतुल सावे यांच्या राजीनाम्याची मागणी

पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील महाज्योती स्कॉलरशिप परीक्षा केंद्रावर कॉम्प्युटर उपलब्ध नसल्याचा विद्यार्थिनींचा दावा आहे. त्यामुळे परीक्षा रद्द करण्यात आली असून रोहित पवारांनी संताप व्यक्त केला.

Oct 07, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026