Tree Collapse

मुंबईत मुसळधार पावसात शाळेच्या बसवर कोसळले महाकाय झाड; 10 विद्यार्थी गंभीर जखमी, एका चिमुकल्याचा मृत्यू

मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच चेंबूर परिसरातून एक गंभीर दुर्घटना समोर आली आहे.

मुंबईत मुसळधार पावसात शाळेच्या बसवर कोसळले महाकाय झाड; 10 विद्यार्थी गंभीर जखमी, एका चिमुकल्याचा मृत्यू

Tree Collapse

चेंबूरच्या 11 नंबर रोडवरील दुर्घटनेनंतर BMC, अग्निशमन दल आणि पोलिसांचे युद्धपातळीवर बचावकार्य; जेसीबीच्या सहाय्याने झाड हटवण्याचे काम सुरू

मुंबई (Tree Collapse) : मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असतानाच चेंबूर परिसरातून एक गंभीर दुर्घटना समोर आली आहे. चेंबूर येथील 11 नंबर रोडवर धावत्या शाळेच्या बसवर अचानक एक मोठे झाड कोसळल्याने बसमधील विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. या अपघातात 10 शाळकरी मुले गंभीर जखमी झाली असून, एक विद्यार्थी अद्याप बसमध्ये अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

सतत सुरू असलेल्या पावसामुळे शहरात विविध ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडत असताना ही दुर्घटना घडली. झाड थेट बसवर कोसळल्याने बसचा वरचा भाग मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाला. अपघाताच्या वेळी बसमध्ये अनेक विद्यार्थी प्रवास करत होते.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. त्यांच्या मदतीने 10 जखमी विद्यार्थ्यांना बसमधून बाहेर काढण्यात आले. मात्र, एक शाळकरी मुलगा अद्याप बसमध्ये अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC), अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने बचाव मोहीम सुरू केली आहे.

बसवर कोसळलेले झाड आकाराने मोठे आणि वजनदार असल्याने ते हटवण्यासाठी जेसीबी मशीन घटनास्थळी मागविण्यात आले आहे. तसेच अत्याधुनिक कटरच्या सहाय्याने झाडाचे फांद्या आणि खोड कापून बसवरील भार कमी करण्याचे काम सुरू आहे. बसमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्याला सुरक्षित बाहेर काढण्याला सध्या प्राधान्य दिले जात आहे.

दरम्यान, जखमी झालेल्या सर्व 10 विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णवाहिकांद्वारे जवळच्या पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. घटनास्थळी सध्या तणावपूर्ण वातावरण असून पोलीस आणि पालिका प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

संबंधित सामग्री

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

पेठ तालुक्यात काळरात्र! खासगी बस अपघातात २ जणांचा मृत्यू, ८ जखमी

नाशिकच्या सावळघाटात खासगी बसचा भीषण अपघात झाला. २ प्रवाशांचा मृत्यू तर ८ जण जखमी झाले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 07, 2026
अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचा खेळ? २० वर्षीय अमन सोनीचा मृत्यू, चार मित्र ताब्यात

मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये २० वर्षीय अमन सोनीचा ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला. अप्पापाडा BMC गार्डनमध्ये ड्रग्जचे इंजेक्शन दिल्याचा कुटुंबीयांचा आरोप असून चार मित्र ताब्यात घेण्यात आले आह

Oct 05, 2026
पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीनंतर ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला आहे. मुंबई-कोकणात दमट उकाडा, पुण्यात बदलते हवामान आणि नागपुरात ३५ अंश तापमान आहे.

Oct 05, 2026
शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.

Oct 05, 2026
अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा आरोप; ३ आरोपी अटकेत

अंधेरीत बांधकाम व्यावसायिकाकडून ३ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप; उर्वरित २५ हजार रुपये घेताना तिघांना अंधेरी पोलिसांनी अटक केली.

Oct 04, 2026