Tribal Families

लातूरच्या वैशालीनगरातील आदिवासी कुटुंबांना रेशन कार्ड देण्याचे अन्न आयोगाचे निर्देश; अध्यक्ष महेश ढवळे यांची पाहणी

महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी बाभळगाव येथील वैशाली नगर परिसराला भेट देऊन तेथील स्थलांतरित कुटुंबांच्या अडचणींचा आढावा घेतला.

लातूरच्या वैशालीनगरातील आदिवासी कुटुंबांना रेशन कार्ड देण्याचे अन्न आयोगाचे निर्देश; अध्यक्ष महेश ढवळे यांची पाहणी

Tribal Families

लातूर : महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी बाभळगाव येथील वैशाली नगर परिसराला भेट देऊन तेथील स्थलांतरित कुटुंबांच्या अडचणींचा आढावा घेतला. या कुटुंबांना शिधापत्रिका (रेशन कार्ड) उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित पुरवठा अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

वैशाली नगरात १९९५ पासून वास्तव्यास असलेल्या अनेक गौड आदिवासी कुटुंबांकडे स्वतःचे घर, नियमित रोजगार किंवा स्थिर उत्पन्नाचे साधन नाही. कागद गोळा करणे, कानातील मळ काढणे तसेच इतर छोटे-मोठे व्यवसाय करून ही कुटुंबे आपला उदरनिर्वाह करत आहेत.

महेश ढवळे यांच्या भेटीदरम्यान अनेक कुटुंबांकडे आधार कार्ड, रेशन कार्ड तसेच इतर आवश्यक शासकीय कागदपत्रांचा अभाव असल्याचे निदर्शनास आले. यानंतर झिरो ते तीन वर्षे वयोगटातील बालके, तीन ते सहा वर्षे वयोगटातील मुले, गर्भवती माता आणि स्तनदा माता यांची नोंद करून त्यांना तातडीने गरम, ताजा व पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्याच्या तसेच मात्र वंदना योजनेचा आर्थिक लाभ देण्याच्या सूचना महिला व बालविकास विभागातील संबंधित सीडीपीओ व सुपरवायझर यांना देण्यात आल्या.

तसेच, रेशन कार्ड नसलेल्या सर्व कुटुंबांची आवश्यक कागदपत्रे संकलित करून त्यांना रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित तालुका पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले.

"कोणताही पात्र नागरिक शासनाच्या मूलभूत सेवा व योजनांपासून वंचित राहू नये. सर्व पात्र लाभार्थ्यांना तातडीने शासकीय सेवा व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात," असे निर्देश महेश ढवळे यांनी संबंधित विभागांना दिले.

यावेळी महिला व बालविकास विभाग तसेच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी, सामाजिक कार्यकर्त्या कांचन वाघमारे आणि जिल्हा प्रशासन संपर्कप्रमुख तुषार वासरकर उपस्थित होते.

संबंधित सामग्री

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

उसाला प्रति टन ५ हजाराचा भाव द्या : शेतकरी संघटना 

Latur Farmers' Organization: गाळप हंगामामध्ये किमान पाच हजार रुपयांचा ऊस दर प्रति मॅट्रिक टन देण्यात यावा, अशी एकमुखी मागणी सर्व शेतकरी संघटनांनी केली. तर मांजरा परिवाराने प्रत्येक गाळप हंगाम..

Oct 06, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026