Trimbakeshwar Kumbh Mela

त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा धर्मध्वज फडकला! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते कुशावर्त तीर्थावर ध्वज

त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याचे धर्मध्वजारोहण संपन्न; शंकराचार्यांसह संत-महंतांची उपस्थिती.

त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचा धर्मध्वज फडकला! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते कुशावर्त तीर्थावर ध्वज

Trimbakeshwar Kumbh Mela

शृंगेरी पीठाचे शंकराचार्य विधुशेखर भारती यांची प्रमुख उपस्थिती; दहा संन्यासी आखाड्यांचे श्रीमहंत, संत-महंत आणि मान्यवरांची उपस्थिती

नाशिक : नाशिकपाठोपाठ आता त्र्यंबकेश्वरमध्येही सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धार्मिक सोहळ्याला उत्साहात सुरुवात झाली आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी धर्मध्वजारोहण करण्यात आले. शृंगेरी पीठाचे उत्तराधिकारी शंकराचार्य स्वामी विधुशेखर भारती यांच्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा पार पडला. यावेळी दहा संन्यासी आखाड्यांचे श्रीमहंत, आखाड्यांचे प्रमुख पदाधिकारी तसेच विविध संत-महंत सहभागी झाले होते.

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्मध्वजारोहण सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. यानिमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री नाशिकमध्ये दाखल होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे शुक्रवारी (30 ऑक्टोबर) रात्रीच नाशिकमध्ये पोहोचले होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रामकुंड परिसरात धर्मध्वजारोहण पार पडल्यानंतर त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दुपारी 12 वाजून 2 मिनिटांच्या मुहूर्तावर हा सोहळा संपन्न झाला. धार्मिक विधी आणि पूजेनंतर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.

राष्ट्रपतींचा त्र्यंबकेश्वर दौरा; गोदाआरतीला उपस्थिती

रामकुंडावरील धर्मध्वजारोहण सोहळ्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्र्यंबकेश्वरकडे रवाना होणार आहेत. तेथे कुशावर्त तीर्थावर पूजा केल्यानंतर त्या पुन्हा नाशिक येथील पोलीस अकादमीत विश्रांतीसाठी परतणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर सायंकाळी आयोजित गोदाआरती सोहळ्याला राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्याचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व काय?

सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून भारतीय संस्कृती, आध्यात्मिक परंपरा आणि धर्माचरणाचा महत्त्वपूर्ण उत्सव असल्याचे मत रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे महंत नरसिंह कृपादास यांनी व्यक्त केले.

भारताची सातत्याने प्रगती होत असताना नागरिकांनीही आपल्या धर्माचे पालन करून देशाच्या विकासात योगदान दिले पाहिजे. देशाची प्रगती आणि स्वधर्माचे आचरण या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे पुढे गेल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याचे धार्मिक महत्त्व तसेच गोदावरी सेवक समितीच्या कार्याची माहितीही दिली.

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील धर्मध्वजारोहण सोहळ्यांमुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला धार्मिक स्वरूप प्राप्त झाले असून, संत-महंत आणि आखाड्यांच्या सहभागामुळे या पर्वाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे.

संबंधित सामग्री

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते धर्मध्वजारोहण संपन्न!

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते धर्मध्वजारोहण संपन्न!

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या उपस्थितीत रामकुंडावर धर्मध्वजारोहण संपन्न! नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याचा शुभारंभ; यंदाचे पर्व 21 महिन्यांचे.

Oct 31, 2026
सिंहस्थ कुंभमेळ्याचा बिगुल वाजणार! नाशिकमध्ये धर्मध्वजारोहणाची जय्यत तयारी

सिंहस्थ कुंभमेळ्याचा बिगुल वाजणार! नाशिकमध्ये धर्मध्वजारोहणाची जय्यत तयारी

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याचा आज शुभारंभ! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत रामकुंडावर दुपारी 12:02 वाजता धर्मध्वजारोहण.

Oct 31, 2026
'उद्धव ठाकरेंनंतर आता एकनाथ शिंदेंची शिवसेना फुटणार?' -अतुल लोंढे

'उद्धव ठाकरेंनंतर आता एकनाथ शिंदेंची शिवसेना फुटणार?' -अतुल लोंढे

शिंदेंची शिवसेना फुटणार? महायुतीतील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते अतुल लोंढेंच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.

Oct 30, 2026
वनार्टीसाठी 19.80 कोटींचा निधी मंजूर! मंत्री संजय राठोड यांच्या पाठपुराव्याला यश; 250 कोटींसाठी मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

वनार्टीसाठी 19.80 कोटींचा निधी मंजूर! मंत्री संजय राठोड यांच्या पाठपुराव्याला यश; 250 कोटींसाठी मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

वनार्टीसाठी 19.80 कोटींचा निधी मंजूर! मंत्री संजय राठोड यांच्या पाठपुराव्याला यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 250 कोटींचे आश्वासन.

Oct 30, 2026
संजय गायकवाड यांच्यावर कारवाईचे संकेत; एकनाथ शिंदे संतप्त, शिंदे गटातून हकालपट्टीची शक्यता?

संजय गायकवाड यांच्यावर कारवाईचे संकेत; एकनाथ शिंदे संतप्त, शिंदे गटातून हकालपट्टीची शक्यता?

शेतकऱ्यांवरील वादग्रस्त विधानामुळे संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढल्या. एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती; हकालपट्टीचीही मागणी.

Oct 30, 2026