अकोल्यातील ‘वंचित’च्या भव्य बैलगाडी मोर्चामध्ये पातूर तालुक्याचा सक्रिय व लक्षणीय सहभाग!

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य जनता होरपळत असून, जनतेला पेट्रोल-डिझेल बचतीचा सल्ला देणारे सत्ताधारी स्वतः मात्र शेकडो गाड्यांचे ताफे व रॅली काढून उधळपट्टी करत आहेत

अकोल्यातील ‘वंचित’च्या भव्य बैलगाडी मोर्चामध्ये पातूर तालुक्याचा सक्रिय व लक्षणीय सहभाग!

Vanchit Bahujan Aghadi

सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेविरोधात व इंधन दरवाढीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचा एल्गार

पातूर (Vanchit Bahujan Aghadi) : सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी भूमिकेविरोधात आणि इंधन दरवाढीच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काल, २५ मे रोजी अकोला येथे काढण्यात आलेल्या भव्य बैलगाडी मोर्चामध्ये पातूर तालुका व शहर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अत्यंत सक्रिय आणि ऐतिहासिक सहभाग नोंदवण्यात आला. पातूर तालुक्यातून मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सर्वसामान्य जनता होरपळत असून, जनतेला पेट्रोल-डिझेल बचतीचा सल्ला देणारे सत्ताधारी स्वतः मात्र शेकडो गाड्यांचे ताफे व रॅली काढून उधळपट्टी करत आहेत. या दुटप्पी धोरणाचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने रस्त्यावर उतरून एल्गार पुकारला.

नियोजन बैठकीचे ठरले फलित; तालुक्यातून मोठा जनसमुदाय दाखल

या मोर्चाच्या यशस्वीतेसाठी २३ मे रोजी पातूर येथे तहसील कार्यालयासमोर एक महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली होती. या बैठकीत ठरलेल्या रणनीतीनुसार, पातूर तालुक्यातून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसह आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांचे मोठे जाळे गोळा करत मोर्चात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

तालुक्यातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे आणि सक्रियतेमुळे अकोल्यातील मोर्चामध्ये पातूर तालुक्याचा दबदबा प्रकर्षाने जाणवला.

प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वात पातूरची घोडदौड

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे केंद्रीय सदस्य अरुंधती ताई शिरसाठ, केंद्रीय सदस्य तथा जिल्हा समन्वयक ॲड. खतीब साहेब, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवर्धन फुंडकर, युवक आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र भाऊ पातोडे, पश्चिम विदर्भ महासचिव बालमुकुंद भिरड यांच्यासह जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे, युवक अध्यक्ष श्रीकांत घोगरे आणि महिला आघाडी अध्यक्षा आम्रपाली ताई खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पातूरच्या टीमने आंदोलनात आघाडी घेतली.

पातूर तालुका व शहराचा संयुक्त पुढाकार

मोर्चामध्ये पातूर तालुक्याचा सहभाग यशस्वी करण्यासाठी तालुकाध्यक्ष डॉ. ओमप्रकाश धर्माळ, तालुका महासचिव शरद सुरवाडे, महिला आघाडी तालुका अध्यक्षा अर्चनाताई डाबेराव, युवक आघाडी तालुकाध्यक्ष सम्राट तायडे, भा. बौ. म. तालुकाध्यक्ष राजेश सरकटे, तालुका महासचिव गोपाल खंडारे, शहर अध्यक्ष जैद भाई, शहर महासचिव विजय बोरकर, शहर महिला आघाडी अध्यक्षा करुणाताई गवई, समतावादी विद्यार्थी आंदोलन तालुकाध्यक्ष निखिल उपरवट आणि समता सैनिक दल प्रमुख दिलीप ताजने यांनी विशेष परिश्रम घेतले.

या आंदोलनात वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवक आघाडी, विद्वत महासभा, भा. बौ. म. आणि समता सैनिक दल पातूर तालुका व शहर कार्यकारिणीचे सर्व विनीत पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते सक्रियतेने सहभागी झाले होते.

संबंधित सामग्री

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

Farm Mechanization Diesel Supply: हार्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेलपुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-7 देश आपत्कालीन साठ्यातील 10 कोटी बॅरल कच्चे तेल-डिझेल बाजार

Oct 04, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत गर्जना मोर्चा; राज ठाकरेंनी SIR रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली.

Oct 04, 2026