40 नगरसेवक पर्यटनावर, चंद्रपूर-गडचिरोलीत राजकीय वादळ ; विधान परिषद निवडणुकीआधीच वातावरण तापलं

पूर्व विदर्भातील चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

40 नगरसेवक पर्यटनावर, चंद्रपूर-गडचिरोलीत राजकीय वादळ ; विधान परिषद निवडणुकीआधीच वातावरण तापलं

Vidhan Parishad Election

(Vidhan Parishad Election) पूर्व विदर्भातील चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच ‘घोडेबाजार’, नगरसेवकांची फोडाफोड आणि गुप्त बैठका यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे जवळपास 40 नगरसेवक अचानक पर्यटनासाठी रवाना झाल्याने चर्चांना उधाण आले असून, त्यांना भाजपकडून सहलीवर पाठवण्यात आल्याची चर्चा रंगत आहे.

5 लाखांचे ‘टोकन’ अन् 15 लाखांपर्यंत व्यवहार?

विश्वासनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटनासाठी नेण्यात आलेल्या काही नगरसेवकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचे ‘टोकन अमाउंट’ देण्यात आल्याची चर्चा आहे. पुढील काही दिवसांत हा आकडा 15 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या ‘टूर’मध्ये सिंदेवाही नगरपंचायतीचे 4, सावली नगरपंचायतीचे 5, नागभीड नगरपरिषदेचे 5 नगरसेवक सहभागी असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय कोरपना, कुरखेडा, कोरची आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील काही लोकप्रतिनिधींचाही सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर मोर्चेबांधणीची जबाबदारी?

मागील विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार  रामदास आंबटकर अत्यंत कमी फरकाने विजयी झाले होते. यावेळी महायुतीकडे संख्याबळ असलं तरी विजय निश्चित मानला जात नाही. त्यामुळे कोणताही धोका पत्करायचा नाही, असा भाजपचा निर्धार असल्याचं बोललं जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या चंद्रपूरमधील एका भाजप आमदारावर संपूर्ण रणनीतीची जबाबदारी सोपवण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

मतदारसंघातील पक्षीय बलाबल

या मतदारसंघात महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत सदस्य मतदान करणार आहेत. सध्या तिन्ही जिल्ह्यांत जिल्हा परिषद अस्तित्वात नसल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्यच निर्णायक ठरणार आहेत.

एकूण मतदार : 977

महायुती

भाजप – 341
शिवसेना (शिंदे गट) – 39
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – 63
रिपाइं (आठवले) – 2

एकूण – 445

महाविकास आघाडी

काँग्रेस – 293
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – 33
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – 25
एकूण – 351

अपक्ष आणि इतर - 91

बावनकुळे यांची प्रतिक्रिया

या संपूर्ण प्रकरणावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांनी प्रतिक्रिया देताना भाजपचा कोणताही संबंध नसल्याचा दावा केला. त्यांनी म्हटलं की, “काँग्रेसचे नगरसेवक कुठे गेले, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. त्यावर भाष्य करणे योग्य नाही. मात्र महायुती राज्यातील सर्व 17 विधान परिषद जागा जिंकेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन

चंद्रशेखर बावनकुळे  यांनी विरोधकांना निवडणूक बिनविरोध करण्याचंही आवाहन केलं. “संख्याबळ महत्त्वाचं असतं. प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात पेट्रोल-डिझेल खर्च होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचं आवाहन केलं आहे. त्यामुळे शक्य असल्यास निवडणुका बिनविरोध व्हाव्यात,” असं त्यांनी म्हटलं. यासाठी त्यांनी हर्षवर्धन सपकाळ ,  शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाही विनंती केल्याचं सांगितलं.

विधान परिषद निवडणूक कार्यक्रम

अधिसूचना जारी : 25 मे
अर्ज भरण्याची अंतिम तारीख : 1 जून
अर्ज छाननी : 2 जून
अर्ज माघारीची अंतिम तारीख : 4 जून
मतदान : 18 जून (सकाळी 8 ते दुपारी 4)
मतमोजणी : 22 जून

१७ जागांवर आधी कोण होते आमदार?

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील 17 विधान परिषद जागांसाठी निवडणूक होत असून, सध्या या जागांवर खालील नेते आमदार आहेत :

सोलापूर : प्रशांत परिचारक (भाजप)
अहिल्यानगर : अरुणकाका जगताप  (राष्ट्रवादी)
ठाणे :  रवींद्र पथक  (शिवसेना)
जळगाव : छबूताई पटेल  (भाजप)
सांगली-सातारा : मोहनराव कदम  (काँग्रेस)
नांदेड : अमर राजूरकर  (काँग्रेस)
यवतमाळ :  सुशांत चतुर्वेदी (शिवसेना)
पुणे : अनिल भोसले  (राष्ट्रवादी)
भंडारा-गोंदिया :  परिणय फुके (भाजप)
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग :  अनिकेत ठाकरे  (राष्ट्रवादी)
नाशिक :  नरेंद्र दराडे  (शिवसेना)
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली :  रामदास आंबटकर (भाजप)
अमरावती :  प्रवीण पोटे (भाजप)
धाराशिव-लातूर-बीड : सुरेश धस (भाजप)
परभणी-हिंगोली : विप्लव बाजोरिया (शिवसेना)
छत्रपती संभाजीनगर-जालना : अंबादास दानवे  (शिवसेना)
नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे  (भाजप)

संबंधित सामग्री

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा गर्जना मोर्चा; राज ठाकरेंच्या दोन प्रमुख मागण्या, ‘SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर मतदान

ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत गर्जना मोर्चा; राज ठाकरेंनी SIR रद्द करून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी केली.

Oct 04, 2026