VNMKV Parbhani

परभणीत भरतीचा 'वाढदिवस' साजरा करत विद्यापीठ प्रशासनाचा निषेध; १४ जुलैपर्यंत भरती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्त भरतीची जाहिरात प्रसिद्ध होऊन वर्ष उलटले तरी भरती प्रक्रिया पूर्ण झाली नाही.

परभणीत भरतीचा 'वाढदिवस' साजरा करत विद्यापीठ प्रशासनाचा निषेध; १४ जुलैपर्यंत भरती न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

VNMKV Parbhani

परभणी (VNMKV Parbhani) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रकल्पग्रस्त भरतीची जाहिरात प्रसिद्ध होऊन वर्ष उलटले तरी भरती प्रक्रिया पूर्ण न झाल्याने संतप्त प्रकल्पग्रस्तांनी शुक्रवारी कुलसचिव कार्यालयात केक कापून 'भरतीचा वाढदिवस' साजरा करत विद्यापीठ प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. यावेळी १४ जुलैपर्यंत भरती प्रक्रिया मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत प्रकल्पग्रस्त भरतीसाठी सुमारे वर्षभरापूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, एक वर्ष उलटूनही भरती प्रक्रिया पूर्ण न झाल्याने प्रकल्पग्रस्त नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. वारंवार होणाऱ्या दिरंगाईच्या निषेधार्थ प्रकल्पग्रस्तांनी शुक्रवारी विद्यापीठाच्या कुलसचिव कार्यालयात केक कापून 'भरतीचा वाढदिवस' साजरा करत प्रशासनाविरोधात अनोखे आंदोलन केले.

यावेळी आंदोलकांनी विद्यापीठ प्रशासनाच्या निष्क्रिय व गलथान कारभाराचा निषेध व्यक्त केला. तसेच, येत्या १४ जुलैपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण न झाल्यास अथवा पुन्हा मुदतवाढ देण्यात आल्यास प्रकल्पग्रस्तांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.

​​​​​​​

यासंदर्भातील निवेदन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलसचिव तसेच परभणीचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. या निवेदनावर सुनील रणेर, लक्ष्मण शिंदे, श्याम रणेर, अन्सिराम कूट, सोपान ढगे, गोविंद शिंदे, वैभव शिंदे, सय्यद सादात, गजानन शिंदे, आदिनाथ रणेर, स्वप्निल रणेर, दीपक शिंदे, गोपाळ थोरात, हरिपाल थोरात, कृष्णा मोहिते, रामप्रसाद भालेराव, पुंडलिक शिंदे, शिवाजी रणेर, सदाशिव शिंदे, आदित यांच्यासह अन्य प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संबंधित सामग्री

डोंगरकडा फाटा येथे एक तास रास्तारोको आंदोलन

डोंगरकडा फाटा येथे एक तास रास्तारोको आंदोलन

Dongarkada Rastaroko Andolan: महाराष्ट्र शासनाने दुष्काळ जाहीर केल्या नंतर प्रशासनाने पंचनामे करत असल्याने दि 6 ऑक्टोबर रोजी डोंगरकडा फाटा येथे नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग रास्तारोको आंदोलन..

Oct 06, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026