Wasmat Panchayat Samiti

वसमत पंचायत समितीतील कंत्राटी अभियंत्याची परभणी कारागृहात रवानगी

लाभार्थ्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी वसमत पंचायत समितीतील कंत्राटी अभियंता गणेश बप्पासाहेब गुजर यांची परभणी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

वसमत पंचायत समितीतील कंत्राटी अभियंत्याची परभणी कारागृहात रवानगी

Wasmat Panchayat Samiti

५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

हिंगोली : लाभार्थ्याकडे पाच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी वसमत पंचायत समितीतील कंत्राटी अभियंता गणेश बप्पासाहेब गुजर यांची परभणी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. मात्र, लाच मागणाऱ्या कंत्राटी अभियंत्याला संशय आल्याने त्याने लाच स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे तो सापळ्यातून निसटल्याने निर्धास्त होता. परंतु, लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने संबंधित कंत्राटी अभियंत्याविरुद्ध सापळा स्थगिती कारवाई करून गुन्हा नोंदविण्यात आला. त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर त्याची परभणी कारागृहात रवानगी करण्यात आली.

वसमत तालुक्यातील कन्होळा येथे गोठ्याच्या कामाची मोजमाप पुस्तिकेत नोंद घेऊन दुसरा व तिसरा हप्ता मिळवून देण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वसमत पंचायत समितीच्या कंत्राटी अभियंत्याविरुद्ध वसमत शहर पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

वसमत तालुक्यातील किनोळा येथील तक्रारदाराने १० जून २०२६ रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या गायगोठा योजनेअंतर्गत मंजूर अनुदानाचा उर्वरित दुसरा व तिसरा हप्ता मिळण्यासाठी मोजमाप पुस्तिका लिहून त्यावर स्वाक्षरी करून पुढील कार्यवाही करण्यासाठी कंत्राटी अभियंता गणेश बप्पासाहेब गुजर यांनी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.

तक्रारीची शहानिशा व पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत आरोपी गणेश गुजर यांनी तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर २२ जून २०२६ रोजी लाच स्वीकारताना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. मात्र, आरोपीला काहीतरी संशय आल्याने त्यांनी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे त्या दिवशी सापळा स्थगित करण्यात आला.

त्यानंतर तक्रारदाराने अनेक वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने भेटणे टाळले तसेच फोनही स्वीकारले नसल्याचे तपासात समोर आले. या संदर्भात अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा स्थगिती कारवाई केली आणि वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, हिंगोलीचे पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या कारवाईवर पोलीस उपअधीक्षक विकास घनवट यांनी पर्यवेक्षण केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बालाजी तिप्पलवाड करीत आहेत.

दरम्यान, कंत्राटी अभियंता गणेश बप्पासाहेब गुजर यांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना वसमत न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची परभणी कारागृहात रवानगी करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांनी दिली.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026