योगा ग्रुप गुरुपौर्णिमा

सुख, शांती व समाधानाचा संदेश; योगा ग्रुपतर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

Yoga Group Gurupurnima: योग शिक्षकांनी गुरुपौर्णिमावरील उत्साहात वृक्षारोपणाद्वारे पर्यावरण संवर्धनाचे संदेश दाखवले. सामाजिक आणि पर्यावरणीय जागरूकता वाढावयाची ही एक पद्धत.

सुख, शांती व समाधानाचा संदेश; योगा ग्रुपतर्फे गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

Yoga Group Gurupurnima

वृक्षारोपणासह योग शिक्षकांचा वृक्ष देऊन सन्मान; पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

कन्हान (Yoga Group Gurupurnima) : सुख, शांती समाधान योगा ग्रुपच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला असुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत उपस्थित सर्व योग शिक्षकांचा वृक्ष भेट देऊन सन्मान करण्यात आला.
       
कार्यक्रमात गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तसेच "एक वृक्ष, एक संस्कार" हा संदेश देत वृक्ष संवर्धनासाठी उपस्थितांनी संकल्प केला. (Yoga Group Gurupurnima) योगाच्या माध्यमातुन समाजात आरोग्य, सकारात्मकता आणि निसर्गप्रेम रुजविण्याचे कार्य सुख, शांती समाधान योगा ग्रुपकडून सातत्याने केले जात असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले. या प्रसंगी ओमप्रकाश काकडे, मिलिंद पोपळकर, शांताराम जळते, शेखर ठाकरे, जितेंद्र चौधरी, प्रतिभा कुंभलकर, यादव मॅडम, सविता नाटकर, रीना चौबे, सचदेवे, संदीप माहुलकर, मालती पोपळकर, प्रमिला वाईकर, पंकज रामटेके, जळते मॅडम आदी उपस्थित होते.
           
कार्यक्रमाचे संचालन मायाताई इंगोले यांनी केले, तर आभार प्रदर्शन संदीप माहुलकर यांनी मानले. गुरुपौर्णिमा आणि वृक्षारोपण या दुहेरी उपक्र मामुळे कार्यक्रमाला सामाजिक आणि पर्यावरणीय जाणिवेची अनोखी किनार लाभली.

संबंधित सामग्री

 दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक विभागाची ‘वृक्ष लागवड व संगोपन’ योजना बंद; काय आहे कारण?

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक विभागाची ‘वृक्ष लागवड व संगोपन’ योजना बंद; काय आहे कारण?

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने अल्पसंख्याक विभागाची ‘वृक्ष लागवड व संगोपन’ योजना बंद करण्याचा निर्णय घेतला.

Oct 02, 2026
चिखलीच्या विकासाला हिरवाईची जोड!

चिखलीच्या विकासाला हिरवाईची जोड!

चिखलीत जयस्तंभ चौक ते खामगाव चौफुली मार्गावर सुरू असलेल्या वृक्षलागवडीची नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी पाहणी करून वृक्षसंवर्धनाच्या सूचना दिल्या.

Sep 17, 2026
२७ ऑगस्टला जागतिक तलाव दिन; तलाव आहेत म्हणून पाणी आहे! जाणून घ्या संवर्धनाचे महत्त्व

२७ ऑगस्टला जागतिक तलाव दिन; तलाव आहेत म्हणून पाणी आहे! जाणून घ्या संवर्धनाचे महत्त्व

२७ ऑगस्ट हा दिवस जगभरात ‘जागतिक तलाव दिन’ म्हणून साजरा केला जातो.

Aug 27, 2026
हिंगोलीत ‘महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर’ अभियानाचा उत्साहात शुभारंभ

हिंगोलीत ‘महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर’ अभियानाचा उत्साहात शुभारंभ

मृद व जलसंधारण, पाणी बचत, जलस्रोतांचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी हिंगोली शहरात ‘महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर’ अभियानाचे उत्साहात आयोजन करण्यात आले.

Aug 21, 2026