सहाय्यक जिल्हाधिकारी योगेश कुमार

सहाय्यक जिल्हाधिकारी योगेश कुमार मीना यांची वरिष्ठ भुवैज्ञानिक विभागाला भेट 

Assistant Collector Yogesh Kumar: सहाय्यक जिल्हाधिकारी योगेश कुमार मीना यांनी हिंगोलीतील भूवैज्ञानिक विभागाला भेट दिली. येथे विकासकामांच्या प्रगतीची पाहणी करण्यात आली

सहाय्यक जिल्हाधिकारी योगेश कुमार मीना यांची वरिष्ठ भुवैज्ञानिक विभागाला भेट 

Assistant Collector Yogesh Kumar

हिंगोली (Assistant Collector Yogesh Kumar) : येथील सहायक जिल्हाधिकारी योगेश कुमार मीना यांनी बुधवारी  वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागाला भेट दिली असता. जिल्ह्याचे वरिष्ठ भू वैज्ञानिक सचिन खोडे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी सहायक भूवैज्ञानिक इंद्रजित दाबेराव, दीपक वाबळे, अशपाक, रमेश रिठे, वरिष्ठ सहायक साळुंके, रणवीर, आदींची उपस्थिती होती. दरम्यान,  सहायक जिल्हाधिकारी  योगेश कुमार मीना (Assistant Collector Yogesh Kumar) यांनी बुधवारी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाला भेट दिली असता कार्यपद्धतीचा आढावा घेतला आणि सुरू असलेल्या विकासकामांच्या प्रगतीची पाहणी करून माहिती जाणून घेतली. 

हिंगोली जिल्ह्यातील भूजल व्यवस्थापन, तांत्रिक प्रगती आणि भविष्यातील नियोजनाच्या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्त्वाची ठरली. या प्रसंगी जिल्ह्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक सचिन खोडे यांनी कार्यालयाच्या 'वर्किंग पॅटर्न'बाबत सविस्तर माहिती देवुन, प्रशासकीय समन्वय अधिक दृढ करण्यावर भर दिला.  खोडे यांनी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, विशेषतः जल जीवन मिशन जलयुक्त शिवार, 1:10 k सर्वेक्षणाचे काम तसेच भूजल मुल्यांकन व  भूजल पुनर्भरण प्रकल्पांच्या तांत्रिक कार्यप्रणाली बाबत सविस्तर माहिती दिली. महसूल प्रशासन आणि भूजल विभाग यांच्यातील तांत्रिक समन्वय वाढवणे, हा या भेटीचा मुख्य उद्देश होता.

संबंधित सामग्री

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

जळीत कांडावरून पुढार्‍यांची फुकट मार्केटिंग; प्रत्यक्ष मदतीत मात्र शिवसेना आघाडीवर

Hingoli Firecracker Fire Incident: सोमवारी रात्री हिंगोलीत घडलेल्या फटाका अग्निकांडातील तिन्ही  मयतांच्या कुटूंबीयांना शिवसेना पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव आर्थिक मदत जाहीर..

Oct 07, 2026
हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

हिंगोलीत अवैध फटाका साठ्यावर पोलिसांची कारवाई, 4 व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल

Illegal firecracker stockpile in Hingoli: मारवाडी गल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली शहर पोलिसांनी अवैध फटाका विक्री आणि साठ्याविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. सराफा गल्ली परिसरात छापा टाकून..

Oct 07, 2026
फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

फटाक्याच्या स्फोटास कारणीभूत ठरल्याने मयतावर गुन्हा दाखल

Hingoli Firecracker Explosion: शहरातील मारवाडी गल्ली येथे ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या भीषण फटाक्याच्या स्फोट प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Oct 07, 2026
हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

हिंगोलीत महाराजा अग्रसेन जयंतीचे सर्व कार्यक्रम रद्द; अग्रवाल समाजाचा निर्णय

Hingoli Aggarwal Society: शहरातील मारवाडी गल्लीत सोमवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या दुर्दैवी आगीच्या घटनेत अग्रवाल समाजातील दोन ते तीन जण जखमी झाले.

Oct 07, 2026
लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

लिंबाळा मक्ता औद्योगिक वसाहतीच्या गोदामात आढळला फटाक्यांचा साठा

Hingoli Firecracker Stock: शहराजवळील लिंबाळा मक्ता भागातील औद्योगिक वसाहतीमध्ये ६ ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या सुमारास हिंगोली ग्रामीण पोलिसांनी एका गोदामा मधील फटाक्यांचा साठा आढळून आल्याने गोदाम सील केल

Oct 07, 2026