सैनिक रोहित चव्हाण

आसोला खुर्द येथील युवक रोहित चव्हाण यांचा सन्मान!

Soldier Rohit Chavan: आसोला खुर्द येथील रोहित चव्हाण यांना भारतीय सेनेतर्फे संमानित केले. त्यांना बॉम्बे इंजीनियरिंग ट्रेनिंग बटालियन-२ मध्ये शिकवण्यासाठी निवडले गेले आहे.

आसोला खुर्द येथील युवक रोहित चव्हाण यांचा सन्मान!

Soldier Rohit Chavan

मानोरा (Soldier Rohit Chavan) : तालुक्यातील आसोला (खुर्द) येथील युवक रोहित विनोद चव्हाण यांची भारतीय सेना बॉम्बे इंजीनियरिंग ट्रेनिंग बटालियन-२, पुणे येथे यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण करून सागर (मध्यप्रदेश) येथे देशसेवेसाठी निवड झाली आहे.  या अभिमानास्प कामगिरीबद्दल मंगळवार दि. ३० जून रोजी संपूर्ण गावात भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, पुष्पवृष्टी करत, माल्यार्पण करून आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत ग्रामस्थांनी रोहित चव्हाण यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान केला.  

सत्कार समारंभात रोहित चव्हाण (Soldier Rohit Chavan) यांनी गावातील युवकांना मार्गदर्शन केले. अनुशासन, प्रामाणिकपणा आणि समर्पणाच्या जोरावर ध्येयप्राप्तीसाठी सातत्याने मेहनत करावी. अपयशाला खचून न जाता सातत्याने अभ्यास करावा तसेच राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असा संदेश त्यांनी दिला. आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आई-वडील, गुरुजन आणि ग्रामस्थांचे सहकार्य व आशीर्वादाला देत रोहित यांनी सर्वांचे आभार मानले.

आसोला खुर्द गावातील सुपुत्राची भारतीय सैन्यात निवड झाल्याने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण असून गावकऱ्यांमध्ये अभिमानाची भावना जागृत झाली आहे. या सत्कार समारंभात गावातील प्रतिष्ठित नागरिक राजकुमार हेडा, उंदरू राठोड, भिकासिंग कसनू राठोड, गजानन राठोड, देवीसिंग जाधव, गोरासेनेचे लखन राठोड, उंदा राठोड, अंकुश जाधव, भोलासिंग राठोड, मिटवा राठोड, रमेश पवार, सचिन राठोड, विनोद चव्हाण, सविता चव्हाण, पुनम राठोड, सरूबाई राठोड, रंजना राठोड, गोपाल जाधव, सुरज जाधव, अतुल जाधव, आदीसह महिला व पुरुष  मोठ्या संख्येने  मिरवणुकीत सहभागी झाले होते. 

संबंधित सामग्री

भारत-चीन सीमेवर तणाव? टाकसिंगमध्ये चिनी घुसखोरीचा दावा; भारतीय जवानांच्या पेट्रोलिंगवरही अडथळ्याचा आरोप

भारत-चीन सीमेवर तणाव? टाकसिंगमध्ये चिनी घुसखोरीचा दावा; भारतीय जवानांच्या पेट्रोलिंगवरही अडथळ्याचा आरोप

अरुणाचल प्रदेशातील दुर्गम टाकसिंग भागातील सीमावर्ती परिस्थितीबाबत गंभीर दावा समोर आल्याने भारत-चीन सीमेवरील घडामोडींनी पुन्हा लक्ष वेधून घेतले आहे.

Aug 14, 2026
‘मला नरेंद्र नावाचीच चीड आली’; बॉक्सर नरेंद्र बेरवाल यांनी PM मोदींना सांगितला पाकिस्तानी बॉक्सरचा भन्नाट किस्सा

‘मला नरेंद्र नावाचीच चीड आली’; बॉक्सर नरेंद्र बेरवाल यांनी PM मोदींना सांगितला पाकिस्तानी बॉक्सरचा भन्नाट किस्सा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी राजधानीतील त्यांच्या निवासस्थानी २०२६ कॉमनवेल्थ गेम्सच्या भारतीय पथकाची भेट घेतली.

Aug 10, 2026
वाशिममध्ये सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीच्या हत्येचा आरोप; लष्करी जवानासह आई-वडिलांना अटक

वाशिममध्ये सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीच्या हत्येचा आरोप; लष्करी जवानासह आई-वडिलांना अटक

वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील शिवनगर येथे सात महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेच्या हत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Aug 07, 2026
जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांच्या बसचा भीषण अपघात; ५० यात्रेकरूंनी भरलेली बस दरीत कोसळली, ३९ जण गंभीर जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये भाविकांच्या बसचा भीषण अपघात; ५० यात्रेकरूंनी भरलेली बस दरीत कोसळली, ३९ जण गंभीर जखमी

जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यात अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला.

Jul 28, 2026
Government Job Rules: शरीरावर टॅटू असेल तर सरकारी नोकरी मिळेल का? आर्मी, पोलीस भरती आणि मेडिकल टेस्टचे नियम जाणून घ्या

Government Job Rules: शरीरावर टॅटू असेल तर सरकारी नोकरी मिळेल का? आर्मी, पोलीस भरती आणि मेडिकल टेस्टचे नियम जाणून घ्या

आजच्या तरुणांमध्ये टॅटू बनवण्याची वाढती आवड ही सामान्य बाब झाली आहे.

Jul 09, 2026