नविन प्राथमिक शाळा मंजूर करा
विद्यार्थ्यांसह पालक, ग्रामस्थांचा परभणीतील जि.प.वर मोर्चा…?
परभणी (New Primary School) : प्राथमिक शिक्षण हा प्रत्येक मुलांचा मुलभूत अधिकार आहे. मात्र पालम तालुक्यातील बेडकी तांडा येथे शाळा नसल्याने विद्यार्थी आजही शिक्षणापासून वंचित आहेत. आमच्या मुलांनी कसं शिकायचं ? असा सवाल करत पालक, ग्रामस्थांनी बुधवार १३ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून विशेष बाब म्हणून प्राथमिक शाळेस मंजूरी द्यावा, अशी मागणी केली आहे. (New Primary School) पालम तालुक्यातील मौ बोरगाव खुर्द अंतर्गत बेडकी तांडा हे मोठी लोकवस्ती असलेले गाव आहे. मात्र स्वातंत्र्याच्या ७८ वर्षानंतरही तांड्यावर अजूनही शिक्षणाची गंगा पोहचली नाही.
तांड्यावर प्राथमिक शाळा नसल्याने विद्यार्थ्यांना ओढे, नाले व नैसर्गिक अडथळे पार करुन एक ते दिड किमी अंतराची पायपीट करावी लागते. वास्तविक मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारा नुकसार शिक्षण घेणे हा (New Primary School) प्रत्येक विद्यार्थ्यांचा मुलभूत अधिकार आहे. शिवाय नव्या शैक्षणिक धोरणानुसार १ किमी अंतराच्या आत प्राथमिक शाळा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. मात्र बेडकी तांड्यावर प्राथमिक शाळा नसल्याने बहूतांश विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे. त्यामुळे शासनाने विशेष बाब म्हणून नवीन प्राथमिक शाळेस मंजूरी द्यावी, अशी मागणी करत बुधवार १३ ऑगस्ट रोजी परभणी जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढला.
या मोर्चात पालक, ग्रामस्थ विद्यार्थ्यांसह सहभागी झाले होते. मागणी संदर्भात दिलेल्या निवेदनावर आकाश राठोड, धोंडिराम राठोड, साहेब जाधव, अविनाश चव्हाण, राजेभाऊ जाधव, बाळू राठोड, गजानन चव्हाण, राजेभाऊ राठोड, प्रकाश राठोड, पिराजी वाघमारे, लहू राठोड, सुनिल राठोड, प्रकाश राठोड आदींच्या स्वाक्षर्या आहेत.