नेरी (Chandrapur) :- चिमूर तालुक्यातील जवराबोडी येथे शेत शिवारात बसक्यावर असलेल्या शेळ्या व मेंढ्यांच्या कळपावर गुरुवारी पहाटेच्या सुमारास लांडग्याने शेळ्या मेंढ्याच्या कळपात घुसून १३ शेळ्या (Goats) ठार केल्या व दोन बकर्याला जखमी केल्याने मेंढपाळाची ८० हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.
मेंढपाळाची ८० हजार रुपयाचे नुकसान झाले
जवराबोडी येथील शेतकरी श्रावण काळे यांचे शेतात आंबोली येथील मेंढपाळ हेमराज थाटकर व दशरथ भोगे आणि लावारि येथील सौरभ रंधये यांनी आपल्या स्वतःच्या व राखणीला असलेल्या शेळ्या व मेंढ्या बसविल्या. या शेळ्या व मेंढ्या बांबू पासून तयार केलेल्या कठर्यामध्ये रात्रभर बसविल्या जातात व पहाटेच्या सुमारास त्या कटर्याबाहेर काढून बसविल्या जातात. याचा फायदा घेऊन दबा धरून बसलेल्या लांडग्याने (Wolves) या शेळ्या व मेंढ्याच्या कळपा मध्ये घुसून तेरा शेळ्यांना जागीच ठार केले व तीन बकर्याला जखमी केले. याची माहिती मेंढपाळांनी वनविभाग शंकरपूरला दिली असता वनविभागाच्या कर्मचार्यांनी मोका चौकशी करून घटनेचा पंचनामा केला व झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाच्या वन विभागाकडे (Forest Department) पाठवण्यात आला. या मेंढपाळांना त्वरित नुकसान भरपाई मिळण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.