हल्ल्यात शेतकरी ठार; दहा दिवसात खुनाची दुसरी घटना
वडगाव पो स्टे (Farmer Murder Case) : वडगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील मौजा आकपुरी शेत शिवारात एका क्षुल्लक वादातून एक शेतकरी गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना १४ जून रोजी घडली. आकपुरी शेत शिवारात गट क्रमांक ४६ व ४७ दरम्यानच्या असलेल्या शेत रस्त्यावर काटे टाकल्याच्या कारणावरून दोन शेतकर्यांमध्ये वाद उफाळून आला,आणि या वादाचे परिणाम थेट रक्तरंजित हल्ल्यात झाले.
सुधाकर महादेव बोटरे (४५) रा.धानोरा असे हल्ल्यात मृत पावलेल्या शेतकर्याचे नाव असून,आरोपी रमेश शामराव कुळसंगे (४०) रा.गणेशपूर याने अचानक रागाच्या भरात हातातील कुर्हाडीच्या लोखंडी मुदनने मृतक सुधाकर बोटरे यांच्यावर जबर हल्ला करत मारहाण केली. या मारहाणीत ते गंभीर जखमी होऊन मृत पावले. ही वार्ता गावात पसरताच नातेवाईकांनी आकपुरी शेत शिवारात धाव घेत बोटरे यांना शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (Farmer Murder Case) मृतक सुधाकर बोटरे यांना आधीच एक वर्षापूर्वी पॅरॅलिसिस झाला होता. त्यात उपचार घेऊन बिमारीत थोडी सुधारणा झाली होती.
वडगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास दांडे, पीएसआय भाऊराव बोकडे आणि पोलीस कॉन्स्टेबल अविनाश खाडे हे तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी रमेश कुळसंगे याला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर गुन्हा दाखल (Farmer Murder Case) करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अधिक तपास ठाणेदार विकास दांडे वडगाव हे करीत आहे. आठ ते दहा दिवसापूर्वी यावली ईजारा येथे महिलेचा खून झाला होता ती शाई वायते न वायत पुन्हा आज धानोरा येथे शुल्लक कारणावरून शेतकर्याचा खून झाल्याने वडगाव परिसर हादरून गेला आहे.