गोदावरी किनारी भागात पोलीसांची कारवाई
परभणी/पाथरी (Illegally sand transport) : तालुक्यातील गुंज ते – गौंडगाव रोडवर पोलिसांनी एका टिप्परद्वारे होत असलेली वाळूची बेकायदेशीर वाहतूक पकडली आहे. याप्रकरणी नफीज शेख शफिक रा . मानवत याला ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १३ एप्रिल रोजी सकाळी ४ वा. सुमारास गुंज गौंडगाव रस्त्यावर असलेल्या ३३ केव्ही समोर लाल रंगाचा टिप्पर एमएच १२ सीटी ६९३९ मधून वाळूची चोरटी वाहतूक करताना आरोपी आढळून आला.
या (Illegally sand transport) टिप्परमध्ये सुमारे अडीच ब्रास वाळू आढळली असून तिची किंमत अंदाजे १५ हजार इतकी आहे. टिप्परची अंदाजे किंमत ४ लाख असून एकूण मुद्देमाल ४ लाख १५ हजारचा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी ज्ञानोबा खटिंग यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि घायवट करीत आहेत. (Illegally sand transport) आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि पुढील तपास सुरू आहे.