क्रेनच्या साह्याने ओढ्यातुन काढली बाहेर
आखाडा बाळापूर (Car Accident) : आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास अचानक कार समोर रान डुक्कर आल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कार आखाडा बाळापूर गावालगत असलेल्या जुन्या मोठ्या ओढ्यात कार औढ्यात पडली. (Car Accident) कार चालकाने कारच्या अर्धवट फुटलेल्या काचा तोडून ते बाहेर आले त्यांच्या डोके, पाय,छाती मार लागुन जखमी झाले. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले.
येरीकेशन कडून आखाडा बाळापूरकडे येणारी कार एम एच 38 एडी 7394च्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार सरळ गावालगत असलेल्या मोठ्या ओढ्यात पुलाच्या बाजुने सरळ पडली होती. सकाळी दहा वाजता क्रेनच्या साह्याने कार ओढ्यातुन बाहेर काढण्यात आली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, बिटप्रमुख शेख अनसार, शिवाजी पवार, प्रशांत शिंदे पोलीस पथकाने भेट दिली.
ओढ्यावरील पुल धोकादायक, कठडे खराब…
आखाडा बाळापूर गावालगत असलेल्या औढ्यावर अत्यंत जुना व लहान पुल आहे सदर भागात दोन्ही बाजूंनी केरकचरा ढिगारे आहेत तसेच सरंक्षण कठडा लोखंडी लहान आहे काही ठिकाणी तुटला आहे. (Car Accident) सदर औढ्यावर मोठा पुल बांधकाम करण्याची जुनी मागणी आहे.या भागात नेहमी अपघात घटना होतात.