आयटकचे नेतृत्व; प्रशासनाला निवेदन सादर
परभणी (Asha workers march) : बुधवार ९ जुलै रोजीच्या देशव्यापी संपात सहभागी होत आयटकच्या नेतृत्वात आशा वर्कर, गट प्रवर्तकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले.
बुधवारी देशातील कामगार, कर्मचारी संघटनांनी देशपातळीवर आंदोलन पुकारले. केंद्र व राज्य सरकार कामगार कर्मचारी विरोधी धोरण राबवत आहे.
कामगार विरोधी श्रम संहिता रद्द करा, आशा गट प्रवर्तकासह सर्व योजना कर्मचार्यांना किमान वेतन, पेन्शन सामाजिक सुरक्षा द्या आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. देशव्यापी संपात सहभागी होत आयटकच्या नेतृत्वात परभणीत आशा वर्कर, गट प्रवर्तक यांनी मोर्चा काढला.
शनिवार बाजार येथून दुपारी वाजता निघालेला मोर्चा मुख्य रस्त्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. मोर्चेकर्यांनी प्रशासनाला निवेदन सादर केले. निवेदनावर कॉ. राजू देसले, राधाबाई पांचाळ, समता कदम, संजीवनी स्वामी, कॉ. मुगाजी बुरुड, रमा वावळे, बानोबी शेख, आशा तिडके, जयश्री पंचांगे, वर्षा बादल, वंदनाताई मिटकरी, अर्चना घाटोळ, अंभोरे, देशमुख, नुजत पठाण, मिना कांबळे, मुळे, सालमोटे, सविता भिसे, अनुसया पांचाळ, शिवम पांचाळ, निर्मला कसारे, पुजाताई, पठाणताई, विद्याताई, सोनाली ताई, बाबर ताई आदींची नावे आहेत.




 
			 
		

